Urulikanchan News : खासदार मतदारसंघात फिरकत नाही, या विरोधकांच्या प्रचाराचा सरपंचाने फाडला बुरखा

खासदार डॉ. अमोल कोल्हे गावात किती वेळा आले याची यादीच केली जाहीर.
Dr. Amol Kolhe
Dr. Amol Kolhesakal

उरुळी कांचन - पूर्व हवेलीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा गावभेट दौरा सुरू असताना पेठगाव (ता. हवेली) येथील माजी सरपंच महादेव चौधरी यांनी खासदार डॉ. कोल्हे गेल्या पाच वर्षांत गावात कितीवेळा आले याची यादीच विरोधकांच्या माहितीसाठी जाहीर केली.

ही यादी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे सुपूर्द करत गावकऱ्यांना याची माहिती दिली. यावेळी डॉ. कोल्हे यांनी ही यादी हातात घेऊन आपण कितीवेळा पेठगाव या गावी आलो याची संपूर्ण माहिती सांगितली. याशिवाय गावामध्ये काय काय विकासकामे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून झाली किंवा मंजूर झाली आहे याची देखील यादी या सरपंचांनी दिली.

दरम्यान, आढळराव पाटील किंवा विरोधकांकडून सातत्याने खासदार गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात फिरकले नसल्याचा खोटा प्रचार केला जात असल्याने विरोधकांना ही जोरदार चपराक लगावली आहे. केवळ "खोटं बोल पण रेटून बोल" असा विरोधकांकडून प्रचार केला जात असताना एका पेठगाव या छोट्या गावात सातत्याने भेट दिली असल्याने खासदार मतदार संघात दिसत नाही हा विरोधकांचा खोटा प्रचार असल्याचे उघड झाले आहे. अशा प्रकारचे विरोधकांचे अनेक खोटे डाव जनताच हाणून पाडत असल्याचे दिसून येत आहे.

विरोधकांकडे इतर मुद्दे नसल्याने "खोटं बोल पण रेटून बोल" अशा पद्धतीचा प्रकार सुरू आहे. कोरोना काळात खासदार निधी मिळत नव्हता, त्यावेळेच्या बातम्या काढून शिळ्या कढीला ऊत आणण्याचा हा प्रकार आहे.

संपूर्ण खासदार निधी खर्च करून वर तीन कोटींचा प्रस्ताव आहे. मी विरोधी खासदार असूनही खासदार निधी केवळ पाच कोटी असताना तरीही साडे एकोणीस हजार कोटी रुपये निधी मतदारसंघात आणू शकल्यामुळे हे सांगताना विरोधकांची अडचण होते आहे.

- डॉ. अमोल कोल्हे, खासदार, (शिरूर हवेली)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com