esakal | खासदार अमोल कोल्हेंनी मांडली शाश्वत शिवजंयतीची संकल्पना!

बोलून बातमी शोधा

mp dr amol kolhe statement shivjayanti celebration}

यंदा आपण शिवरायांची ३९१ वी जयंती साजरी करत आहोत. यानिमित्ताने गावा गावांत ३९१ झाडे लावू आणि ती जगवू. या मातीला शाश्वत देणं देण्याचा शिवरायांचा विचार जागवू या, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.

खासदार अमोल कोल्हेंनी मांडली शाश्वत शिवजंयतीची संकल्पना!
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

जुन्नर (पुणे) : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळं शिवजयंती साधेपणानं करण्याचं आवाहन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय. शिवनेरीवर शिवजन्म सोहळ्याला केवळ 100 जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आलीय. अभिनेत सयाजी शिंदे यांनी यंदाच्या शिवजयंतीला पन्हाळगडावर झाडे लावण्याचा संकल्प जाहीर केलाय. आता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीदेखील यंदाची शिवजयंती शाश्वत शिवजंयती साजरी करण्याची कल्पना मांडली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

डॉ. कोल्हे यांचे आवाहन
यंदा आपण शिवरायांची ३९१ वी जयंती साजरी करत आहोत. यानिमित्ताने गावा गावांत ३९१ झाडे लावू आणि ती जगवू. या मातीला शाश्वत देणं देण्याचा शिवरायांचा विचार जागवू या, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९१ व्या जयंतीच्या निमित्ताने खासदार डॉ. कोल्हे यांनी वन उपविभाग, जुन्नर आणि पुरातन विभागाच्या सहकार्याने शिवनेरी गडावर ३९१ देशी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. याच संकल्पाची व्याप्ती वाढवत खासदार डॉ. कोल्हे यांनी गावोगावच्या ग्रामपंचायतींना ३९१ देशी झाडे लावून ती वर्षभर जगविण्यासाठी नियोजन करण्याचे आवाहन केले.

गावा गावात लावणार झाडे
प्रत्येक गावात ३९१ देशी वृक्ष लावण्याच्या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेनेही सहकार्य केले असून ही झाडे लावण्यासाठी मनरेगा योजनेंतर्गत कार्यक्रम राबविण्याचे आवाहनही ग्रामपंचायतींना केले आहे. तसेच ज्या ग्रामपंचायती या उपक्रमात सहभागी होतील त्यांनी वृक्षारोपणाची छायाचित्रे आपल्याला पाठवावीत आपण आपल्या फेसबुक पेजवर या ही छायाचित्रे माहितीसह प्रसिद्ध करणार असल्याचचेही खासदार डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा - राज्याभिषेक दिन सोहळा शिवस्वराज्य दिन होणार!

छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारं प्रत्येक गाव आणि शिवभक्त या उपक्रमात सहभागी होईल. हा उपक्रम यशस्वी करुन शाश्वत शिवजयंती साजरी करतील असा मला विश्वास आहे. त्यासाठी चला संकल्प करु या. माझी शिवजयंती. शाश्वत शिवजयंती!
- डॉ. अमोल कोल्हे, खासदार