esakal | पुणे लॉकडाऊनवरून गिरीश बापट अजित पवारांवर बरसले
sakal

बोलून बातमी शोधा

girish bapat

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय एकतर्फी घेतला, निर्णय घेण्यापूर्वी भाजपच्या आमदार खासदारांना विचारात घेतले नसल्याने खासदार गिरीश बापट यांनी नाराजी व्यक्त केलीय. 

पुणे लॉकडाऊनवरून गिरीश बापट अजित पवारांवर बरसले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात 13 जुलै ते 23 जुलै पर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय एकतर्फी घेतला, निर्णय घेण्यापूर्वी भाजपच्या आमदार खासदारांना विचारात घेतले नसल्याने खासदार गिरीश बापट यांनी नाराजी व्यक्त केलीय. पुण्यात सोमवारी मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. पुढचे दहा दिवस हा लॉकडाऊन असणार आहे. याची घोषणा शुक्रवारी पालकमंत्री अजित पवार यांनी केली. यावरून आता भाजजप नेते आणि खासदार गिरीश बापट यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गिरीश बापट म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता ती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा काही एकमेव उपाय नाही. यासाठी रुग्णालय, ॲम्बुलन्स, औषध यांची सुसज्जता महत्त्वाची आहे. त्याशिवाय कंटेनमेंट भागात नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेही गरजेचे आहे. काही लोकांच्या बेशिस्तपणा मुळे शिस्तीत वागणाऱ्या सर्व लोकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचंही ते म्हणाले.

हे वाचा - वाट बघतोय रिक्षावाला! पुणेकरांच्या सेवेसाठी लॉकडाऊनमध्ये 500 रिक्षा उपलब्ध

खासदार बापट म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील खासदार, आमदार, नगरसेवक आणि भाजपचे पदाधिकारी सर्व मिळून कोरोनाविरुद्ध लढाई लढत आहेत. आणि अशा परिस्थितीत प्रशासन जर आम्हाला विचारात न घेता निर्णय घेत आहे, आम्हाला कोरोनाच्या बाबतीत राजकारण करायचं नाहीये. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाला आम्ही सहकार्य जरुर करू पण या प्रक्रियेत लोकप्रतिनिधी सोबत चर्चा न केल्यास आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशाराही बापट यांनी दिला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अजित पवार यांनी लॉकडाऊनचा निर्णय एकतर्फी घेतल्याचं गिरीश बापट यांनी म्हटलं. कोणत्याच लोकप्रतिनिथींना विश्वासात न घेता हा निर्णय घेतला आहे. यात आम्ही सहकार्य करू पण निर्णयाचा पुनर्विचार झाला पाहिजे. सध्या लोकांना रोजगार नाही. लोकांच्या अडचणी वाढत आहेत आणि सरकारकडून अजुनही पॅकेज जाहीर कऱण्यात आलेलं नाही. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय नाही. टेस्टिंग वाढायला पाहिजे असंही बापट यांनी सांगितलं.

Edit and Published By - सूरज यादव