esakal | ३७०चा आणि महाराष्ट्राचा संबंध काय हे शहीदांच्या मातांना विचारा- खा. नामग्याल
sakal

बोलून बातमी शोधा

MP Jamyang Namgyal speech in pune

कलम ३७० रद्द केले याचा महाराष्ट्राच्या निवडणुकीशी काय संबंध असा सवाल उपस्थित केला जात आहे. ज्यांना हा प्रश्न पडत आहे, त्यांनी ज्या मातांची मुले जम्मू कश्मीरमध्ये शहीद झाली त्यांना जाऊन काय संबंध आहे? हे विचारा  तुम्हाला उत्तर मिळेल अशा शब्दात लडाखचे भाजपचे खासदार जमयांग नामग्याल टीकाकारांना उत्तर दिले.

३७०चा आणि महाराष्ट्राचा संबंध काय हे शहीदांच्या मातांना विचारा- खा. नामग्याल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कलम ३७० रद्द केले याचा महाराष्ट्राच्या निवडणुकीशी काय संबंध असा सवाल उपस्थित केला जात आहे. ज्यांना हा प्रश्न पडत आहे, त्यांनी ज्या मातांची मुले जम्मू कश्मीरमध्ये शहीद झाली त्यांना जाऊन काय संबंध आहे? हे विचारा  तुम्हाला उत्तर मिळेल अशा शब्दात लडाखचे भाजपचे खासदार जमयांग नामग्याल टीकाकारांना उत्तर दिले.

भाजपतर्फे म्हात्रे पुल डीपी रस्त्यावरील सिद्धी बँक्वेट येथे आयोजित कार्यक्रमात  "कलम ३७०, ३५अ आणि लडाख" या विषयावर खासदार नामग्याल बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,  खासदार गिरीश बापट, संयोजन शेखर मुंदडा यावेळी उपस्थित होते.

नामग्याल म्हणाले, महाराष्ट्र व लडाख यांच्यातील मैत्रीपर्व सुरू झाले. अनेकजण पर्यटनासाठी येतात. आता तेथे गुंतवणूकही करू शकता. पण संधीसाधू लोकांनी लडाखमध्ये न आलेलेच चांगले आहे. लडाख केंद्र शासित प्रदेश असला तरी तेथील संस्कृती, परंपरा टिकली पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही आहोत.

शाम प्रसाद मुखर्जी यांनी कश्मीर साठी बलिदान दिले, जम्मू कश्मीर हा केवळ जमीनीचा तुकडा नाही, तर भारताचा अविभाज्य घटक आहे. काही राजकीय कुटूंबाच्या रोजीरोटीसाठी ३७० कलम रद्द केले जात नव्हते. काँग्रेससह विरोधी पक्षांनी संसदेत व संसदेच्या बाहेर ३७० कलम रद्द करण्यास विरोध केला. कश्मीरची संस्कृती, परंपरा वेगळी असेल पण त्यांचा देश वेगळा असू शकत नाही. काँग्रेसला संपूर्ण देश एकसंघ का नको ? याच राजकीय पक्षांमुळे व कुटुंबांमुळे कश्मीरचा विकास होऊ शकला नाही. 
मुलांना शिक्षण, तरुणांना रोजगार मिळाला नाही. गेल्या ७० वर्षात तेथील समस्या का सुटल्या नाहीत, याचे उत्तर विरोधकांनी दिले पाहिजे.

लडाखमध्ये बसलेले लोक पुणे, मुंबईतील लोकांचा झालेला विकास बघतात. तुमच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळते. त्यामुळे भाजपला मतदान करा. ज्यांनी ३७०ला विरोध केला, शहीदांचा अपमान केला. शहीद मातांचे आश्रु त्यांना समजले नाहीत. त्यांना मतदानातून उत्तर द्या, असे आवाहन नामग्याल यांनी केले. 

गिरीश बापट म्हणाले, नामग्याल हा पठ्ठ्या एवढ्या तयारीचा आहे, ३७० च्या भाषणात संसदेत विरोधकांचा समाचार घेतला, रोखठोक उत्तरे दिले. चंद्रकांत पाटील यांच्यामुळे पुण्याचा विकास होईल. आता कोल्हापूरसह पुण्यालाही भरपूर पैसे द्या. 

पाकव्याप्त कश्मीर ही आपला असेल
कश्मीर जसा आपला आहे, तसाच पाकव्याप्त कश्मीर ही आपलाच आहे. पंडित नेहरू यांच्या चुकीमुळे हा भाग आपल्याकडे आला नाही. तो आपल्याकडे येण्यासाठी भाजपचा थीकं टँक काम करत आहे. हे काम देखील सरकार करेल, असे नामग्याल यांनी स्पष्ट केले. 

चिखलात कमळ फुलले
नामग्याल यांचे भाषण सुरू असताना मुसळधार पाऊस सुरू होता. यावेळी ते म्हणाले, पुण्याचे हवामान चांगले आहे, पाऊस पडतोय, त्यामुळे होणाऱ्या चिखलात नक्कीच कमळ फुलेल. भाजप विधानसभा निवडणूक जिंकणार.