mp nilesh lanke
sakal
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अहिल्यानगर लोकसभा मतदार संघाचे खासदार नीलेश लंके यांना वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी रूबी हॉल क्लिनिक रुग्णालयात शुक्रवारी दुपारी दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर वैद्यकीय तपासण्या व उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली.