संविधान वाचविण्याची भाषा करणाऱ्यांचे ढोंग उघड करा : प्रदीप रावत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

पुणे : "नागरीकत्व सुधारणा कायद्यामुळे (सीएए) कोणाचेही नागरीकत्व धोक्यात येणार नाही. मात्र त्याविरुद्ध आंदोलन करणारे देशाला अस्थिर करण्याचे देशविघातक काम करीत आहेत. त्यामुले कार्यकर्त्यांनी संविधान वाचविण्याची भाषा करणाऱ्याचे ढोंग उघड केले पाहिजे." असे मत माजी खासदार प्रदीप रावत यांनी मंगळवारी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अखिल भारतीय परिषदेच्या पुणे महानगर विभागतर्फे सीएए समर्थनार्थ "भारत सुरक्षा यात्रा" या 300 फूट तिरंगा पदयात्रा काढण्यात आली होती. या यात्रेची सुरुवात गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात झाली, तर  समारोप शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालय सुरु आहे. या पदयात्रेनंतर मॉडर्न महाविद्यालयात सभा घेण्यात आली. यावेळी जेएनयु"चे अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेचे सचिव मनीष जांगीड, पुणे महानगरमंत्री अनिल ठोंबरे उपस्थित होते.

रावत म्हणाले, "नागरिकत्व सुधारण कायद्याविरोधात (सीएए) आज जे लोक आंदोलन करीत आहेत, त्यांचा मूळ हेतु लोकांसमोर आणला पाहिजे. सीएएच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणत विषारी प्रचार सुरु आहे. देशातील वातावरण दूषित करण्याचा व देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.''

पाकिस्तानमध्ये हिंदू नवरीचे अपहरणानंतर धर्मांतर करून लावले लग्न

जांगीड म्हणाले, "सीएए कायदा कोणत्याही धर्माविरुद्ध नाही. भाजपला बदनाम करण्याचे कारस्थान आहे. डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून तरुणाची दिशाभूल केली जात आहे.ते सीएएला जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम वादाचा रंग दिला जात आहे. पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, मनमोहन सिंह यांनी सीएएला समर्थन दिले होते."

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Pradip Rawat speaks at CAA support rally in Pune