सारथी संस्थेसाठी खासदार संभाजीराजे आक्रमक; घेतला मोठा निर्णय!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 January 2020

शेकडो विद्यार्थ्यांसोबत 11 जानेवारीला संभाजीराजे लाक्षणिक उपोषणाला बसणार आहेत. याबाबत ते म्हणाले, 'सारथी प्रकरणात अनेकदा लक्ष घालून कुठलीच कार्यवाही होत नसल्याने आंदोलन करणार आहे.

पुणे : मराठा, कुणबी समाजातील तरुणांना दिशा देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेवर राज्य सरकारने निर्बंध लादल्याने या संस्थेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्या विरोधात खासदार संभाजीराजे छत्रपती करणार संस्थेसाठी पुणे येथे आंदोलन करणार आहेत. शेकडो विद्यार्थ्यांसोबत 11 जानेवारीला संभाजीराजे लाक्षणिक उपोषणाला बसणार आहेत. याबाबत ते म्हणाले, 'सारथी प्रकरणात अनेकदा लक्ष घालून कुठलीच कार्यवाही होत नसल्याने आंदोलन करणार आहे."

FTII मधील PIFF चे चित्रपट प्रदर्शन रद्द कारण...
 

संस्थेतील कारभारावर आक्षेप घेत राज्य सरकारने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे संस्थेचा अर्थपुरवठा बंद झाला असून मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना पाठ्यवृत्ती देखील मिळालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे. याबाबत काही दिवसांपूर्वीच संभाजी महाराज यांनी सारथी संस्थेला भेटही दिली होती.

शिवाजीराव भोसले बँक प्रकरणी भोसले दांपत्यावर गुन्हा दाखल

संभाजी राजे पुढे म्हणाले, ''सारथी संस्था वाचवण्यासाठी, मराठा समाजातील तरुणांच्या हक्कासाठी मी आयुष्यात पहिल्यांदा लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे. गेले अनेक दिवस मी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे, विशेष म्हणजे या संस्थेचे उदघाटन माझ्या अध्यक्षतेखालीच झाले होते. या संदर्भात काही दिवसांपूर्वी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटलो होतो. त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तात्काळ मार्ग काढण्याचा शब्दही दिला होता. त्यानंतर , दुसऱ्याच दिवशी मी सारथीच्या पुण्यातील कार्यालयात जाऊन, दोन्ही बाजूंची भूमिका समजुन घेतली आणि सरकार स्थिरस्थावर होईस्तोवर कुठलाच नवीन आदेश न काढण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु जे पी गुप्ता हे प्रधान सचिव दररोज नवीन आदेश काढून संस्थेला बदनाम करत असल्याचे दिसून येत आहे. त्यांना अशी कोणती घाई झाली आहे, की दररोज आदेश काढत आहेत?''

पुणे मुंबई मार्गाने प्रवास करताय? जाणून घ्या महत्वाचे वाहतूक बदल

आज मला जाणीव झाली आहे की, ''लोकशाही मार्गाने या मनमानी विरोधात लाक्षणिक उपोषण करण्याशिवाय पर्याय नाही. 11 जानेवारी सारथी कार्यालयाजवळ शेकडो कार्यकर्ते आणि सारथीच्या लाभार्थ्यांसोबत बसणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mp sambhaji raje to protest for sarthi institute pune