पुणे मुंबई मार्गाने प्रवास करताय? जाणून घ्या महत्वाचे वाहतूक बदल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

पुण्याकडून त्रिवेणीनगरकडे जाणारी वाहने भक्ती-शक्ती चौकातून डाव्या बाजूला वळून अप्पूघरमार्गे ट्रान्सपोर्टनगरमधून निगडी नाका येथून युटर्न घेवून पीएमपी बस डेपोमधून डावीकडे वळून त्रिवेणीनगरकडे जातील. मुंबईकडून पुणेकडे जाणारी वाहने पीएमपी बस डेपोमधून डावीकडे वळून चिकन चौकातून पुन्हा उजवीकडे वळून दुर्गा चौकमार्गे टिळक चौकाकडे अथवा सरळ थरमॅक्‍स चौकाकडे जातील.

पिंपरी : निगडीतील भक्ती-शक्ती चौकात ग्रेडसेपरेटर व उड्डाणपुलाचे काम सुरु असून या कामासाठी भक्ती-शक्ती चौक परिसरातील वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. 
पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतून भक्ती-शक्ती चौकातून डाव्या बाजूला वळून अप्पूघरमार्गे ट्रान्सपोर्टनगरमधून पुणे-मुंबई रस्त्यावर वळविण्यात आली आहे.

गोट्या, लगोर, सुरपाट्या खेळायचंय, चला बारामतीत

पुण्याकडून त्रिवेणीनगरकडे जाणारी वाहने भक्ती-शक्ती चौकातून डाव्या बाजूला वळून अप्पूघरमार्गे ट्रान्सपोर्टनगरमधून निगडी नाका येथून युटर्न घेवून पीएमपी बस डेपोमधून डावीकडे वळून त्रिवेणीनगरकडे जातील. मुंबईकडून पुणेकडे जाणारी वाहने पीएमपी बस डेपोमधून डावीकडे वळून चिकन चौकातून पुन्हा उजवीकडे वळून दुर्गा चौकमार्गे टिळक चौकाकडे अथवा सरळ थरमॅक्‍स चौकाकडे जातील.

पिंपरीत सिमेंट काँक्रीटचा ब्लॉक डोक्‍यात मारून एकाचा खून 
 
मुंबईकडून भेळ चौक, संभाजी चौकाकडून मुंबईकडे जाणारी वाहने अप्पूघरमार्गे ट्रान्सपोर्टनगरमधून मुंबई-पुणे रस्त्यावर वळतील. संभाजी चौकाकडून त्रिवेणीनगरकडे जाणारी वाहने अप्पूघरमार्गे ट्रान्सपोर्टनगरमधून निगडी नाका येथून युटर्न करून पीएमपी बस डेपोमधून डावीकडे वळून त्रिवेणीनगरकडे जातील. अथवा भेळ चौक, टिळक चौकमार्गे त्रिवेणीनगरकडे जातील. त्रिवेणीनगरकडून पुण्याकडे जाणारी वाहने टिळक चौक मार्गे अथवा थरमॅक्‍स चौक, खंडोबा माळ मार्गे पुण्याकडे जातील. त्रिवेणीनगरकडून पुणेकडे अथवा बिजलीनगरकडे जाणारी वाहने दुर्गा चौक, टिळक चौकमार्गे भेळ चौकातून बिजलीनगरकडे जातील.

Video : डायबिटीज आहे, मग अशी जपा 'किडनी'

त्रिवेणीनगरकडून मुंबईकडे जाणारी वाहने टिळक चौक, भक्ती-शक्ती चौकातून डावीकडे वळून अप्पूघर मार्गे ट्रान्सपोर्टनगरमधून मुख्य रस्त्यावरून मुंबईकडे जातील. अथवा टिळक चौकातून भेळ चौक मार्गे रावेत मार्गे मुंबईकडे जातील. दरम्यान या पुलाच्या कामासाठी टप्प्याटप्प्याने वाहतुकीत बदल केला जाणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: traffic changes At bhakti shakti chowk on the Pune Mumbai route

टॅग्स
टॉपिकस