खासदार शिरोळे यांनी रेल्वे प्रशासनास क्लीन चिट देवू नये ; आप

1AAP_1.jpg
1AAP_1.jpg

पुणे : ''खासदार शिरोळे यांनी रेल्वे प्रशासनास क्लीन चिट देवू नये. असा आरोप आम आदमी पार्टीने आरोप केला आहे. जुना बाजार येथे होर्डिंग पडुन चार जण मृत्युमुखी पडल्याची घटना शुक्रवारी (ता.5) घडली. यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहेत.

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी बोलून तातडीने मृत व्यक्तीस पाच लाख आणि जखमींना 1 लाख नुकसान भरपाई मिळवून दिल्याचे वक्तव्य खासदार अनिल शिरोळे यांनी टि्वटर टाकलेल्या  व्हीडिओमार्फत केले होते.  त्याचा निषेध करत ''मोटार वाहन विमा नियमांप्रमाणे ही नुकसान भरपाई १५ लाख रुपयांहून अधिक अपेक्षित असताना केवळ ५ लाख रुपये देऊन खासदार अनिल शिरोळे हे अप्रत्यक्षपणे रेल्वेच्या चुकांवर पांघरूण घालत आहे. किरकोळ नुकसान भरपाई देऊन रेल्वेस क्लीन चीट देत आहेत. अशी भूमिका आम आदमी पार्टीने घेतली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com