PHOTOS : करिष्मा-करिनासोबत सुप्रिया सुळेंचा हटके अंदाज

टीम ईसकाळ
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

सुप्रिया सुळेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यात त्या चक्क कपूर फॅमिलीसोबत दिसत आहेत. आता तुम्ही विचार कराल की सुळे आणि कपूर एकत्र कसे काय...

पुणे : आधी लोकसभा आणि मग विधानसभा निवडणूकांमध्ये सक्रियपणे प्रचार करताना खासदार सुप्रिया सुळे आपल्याला दिसल्या. त्यानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातही महाविकासआघाडीच्या निर्मितीत सुळेंचा महत्त्वाचा वाटा होता. यावेळी वडिल शरद पवार यांच्यासह खंबीरपणे उभे राहणे असो की माध्यमांशी निर्भिडपणे बोलणे असो. त्या कायमच पुढे राहिल्या. पण आता त्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. एका निवांत क्षणीचे त्यांचे काही खास फोटो व्हायरल होतायत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुप्रिया सुळेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यात त्या चक्क कपूर फॅमिलीसोबत दिसत आहेत. आता तुम्ही विचार कराल की सुळे आणि कपूर एकत्र कसे काय... तर ऋषी कपूर यांची बहिण रिमा जैन या सुप्रिया सुळेंच्या मैत्रीण आहेत. रिमा यांचा मुलगा व अभिनेता अरमान जैन याचा साखरपुडा नुकताच पार पडला. यावेळी सुप्रिया सुळे व त्यांचे पती सदानंद सुळे दोघेही उपस्थित होते. 

'खरी टुकडे टुकडे गँग तुमचीच'; मोदींना रेणुका शहाणेंचे सडेतोड प्रत्युत्तर...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Congratulations Armaan and Anisa!

A post shared by Supriya Sule (@supriyasule) on

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Congratulations Rima and Manoj! #LatePost

A post shared by Supriya Sule (@supriyasule) on

या सर्व फोटोंमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधले गेले ते करिष्मा, करिना व सुप्रिया सुळे यांच्या फोटोने. या तिघींनी फोटोसाठी एकदम हटके पोझ दिली आहे. तर ऋषी कपूर व सुप्रिया सुळे यांचा फोटोही विशेष व्हायरल होतोय. अरमानचे लग्न अनिसा मल्होत्रा हिच्यासोबत ठरले आहे. त्यांच्या रोक्यादिवशी अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. यापैकीच सुळे कुटूंबियही होते.

ट्विटरवर कलाकारांवर भडकले नेटकरी; म्हणतात, #ShameonBollywood

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

With the Lovely K Girls - Karishma and Kareena!

A post shared by Supriya Sule (@supriyasule) on

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Thank You - Rishi Kapoor!

A post shared by Supriya Sule (@supriyasule) on

यापूर्वीही रिमा व सुळे यांचे एकत्र फोटो सुप्रिया यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Best Aarti always ... Manoj and Rima . @rimosky #ganpatibappamorya

A post shared by Supriya Sule (@supriyasule) on

अनेक कौटुंबिक कार्यक्रम, गणेशोत्सव, कुटूंबातील सदस्यांचे वाढदिवस, दोन्ही कुटूंबातील तरूणाई आपल्याला सुप्रिया यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिसते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

With our babies @parthajitpawar @therealarmaanjain @anissamalhotra @aadarjain

A post shared by Supriya Sule (@supriyasule) on

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Supriya Sule attends Functions of Kapoor family