बारामती - भारताच्या सरन्यायाधिशांवर हल्ला होणे हा दिवस काळा दिवस म्हणावा लागेल, या विषयाची संसदेत चर्चा घडवून आणत या घटनेचा एकमुखी निषेध होण्यासाठी सरकारला आपण विनंती करणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली..बारामतीत मौन आंदोलन केल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, सरन्यायाधिशांवर हल्ला होणे ही बाब चिंताजनक असून अशा प्रवृत्तींना वेळीच आवर घालण्याची गरज आहे..सरसकट कर्जमाफी द्या....राज्यात अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल असून त्याला सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे. बळीराजाला पुन्हा उभे करण्याचे काम करावे लागणार आहे. रस्ते दुरुस्ती, शाळांच्या इमारतींची दुरुस्तीसह आवश्यक त्या बाबी करण्याची गरज आहे. कर्जाची वसुली पूर्णपणे बंद करून नवीन कर्ज देत लोकांना पुन्हा उभे करण्याचे काम सरकारला करावे लागेल..निवडणूक आयोगाबाबत मनात प्रश्न निर्माण होत आहेत ते भारतासाठी आणि सशक्त लोकशाहीसाठी योग्य नाही.राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत बोलताना त्या म्हणाल्या, जेवढे पैसे येतात व खर्च होतात, त्याला एक नियम आहे, तुम्ही कितीहीपैसे खर्च करायला लागला तर दिवाळंच निघणार ना... राज्य शासन व अर्थ विभाग दोन्हीही सध्या अडचणीत आहे. जागतिक बँकेकडून सर्वाधिक कर्ज घेणारा देश भारत आहे, राज्यावरही कर्जाचा डोंगर झाला आहे. एकीकडे रस्त्यासाठी 80 हजार कोटी खर्च करणार दुसरीकडे कर्जमाफीसाठी मात्र पैसे नाहीत..स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका अनेकदा आम्ही मित्रपक्ष स्वतंत्रपणे लढलो आहोत, त्या त्या ठिकाणी परिस्थितीनुसार काही निर्णय घ्यावे लागतात कारण या निवडणूका या कार्यकर्त्यांच्या असतात. पुढील आठवडयात सर्वच पक्षांच्या बैठका आहेत, दिवाळीपर्यंत कशा निवडणूका लढवायच्या याचे चित्र स्पष्ट होईल..यंदा दिवाळीच अजून ठरलेल नाही....यंदा राज्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीने झालेले नुकसान व दुसरीकडे आमच्या काकींचे झालेले निधन या पार्श्वभूमीवर दिवाळी साजरी करायची की नाही याचा निर्णय घेतलेला नाही. या बाबत कौटुंबिक चर्चा करुन तुम्हाला या बाबत सांगू, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.