बारामतीतील विरोधी नगरसेवक... अन् खासदार सुप्रिया सुळे...मग घडले असे की...

मिलिंद संगई, बारामती
Sunday, 17 May 2020

खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तरप्रदेशात अडकून पडलेल्या चौदा जणांना पुन्हा बारामतीत सुखरुप येण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.

बारामती : लॉकडाउनच्या काळात राजकारण बाजूला पडल्याचे अनेकदा सिद्ध झाले. बारामतीतही नगरपालिकेत विरोधी पक्षनेते असलेले व राष्ट्रवादीच्या विरोधातील नगरसेवक सुनील सस्ते यांच्या आवाहनाला तातडीने प्रतिसाद देत खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तरप्रदेशात अडकून पडलेल्या चौदा जणांना पुन्हा बारामतीत सुखरुप येण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. कोरोनाच्या संकटात सगळेच एकत्रित काम करत असल्याचे सुखद चित्र या निमित्ताने पुढे आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बारामतीतील खंडोबानगर येथे राहणारे रेशमा राजू आतार, मुसकान राजू आतार, साहिल राजू आतार, जिलानी रमजान शेख, शाहिन जिलानी शेख, सलिम रमजान शेख, चांदणी सलीम शेख, नईम सलीम शेख, सुमैया शाहिद शेख, आयेशा आलाऊद्दीन पठान, आरिफ आलाऊद्दीन पठान, आशाबानू नसिर सूतार ,मुनीर नसिर सूतार, सलमान जाफर शेख हे चौदा जण उत्तरप्रदेशातील बसती जिल्ह्यातील भानपूर तालुक्यातील कनथुई या गावात 18 मार्चपासून अडकून पडले होते. एका विवाहसमारंभासाठी हे सगळे तिकडे गेले होते. 

पुण्यावर नामुष्की : ऍम्ब्युलन्स न आल्यानं रस्त्यावर एकाचा मृत्यू 

दरम्यान, बारामतीतील पुनावाला गार्डनसमोर खेळणी विकून ही मंडळी उदरनिर्वाह करतात. लॉकडाउनमध्ये अडकून पडल्याने त्यांची पंचाईत झाली होती. त्यांनी नगरसेवक सुनील सस्ते यांच्याशी संपर्क साधला. सस्ते यांनी सुप्रिया सुळे यांचे स्वीय सहायक नितीन सातव यांच्यामार्फत सुळे यांच्याशी संपर्क केला.

- 'फुकट काम करा, नाहीतर राजीनामा द्या'; पुण्यातील आयटी कंपनीचा प्रताप!

बारामतीतील काही परप्रांतीयांना सोडण्यासाठी एक गाडी लखनऊला जाणार होती. याच गाडीतून हे 14 जण परत येऊ शकत होते, मात्र जिल्हाधिका-यांच्या परवानगीची गरज होती. सुप्रिया सुळे यांनी तातडीने हालचाली करुन ही परवानगी मिळवून दिली. आज हे 14 जण नाशिकमार्गे बारामतीत परतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Supriya Sule helps stranded citizens in UP