'ताई, पुराने होत्याचं नव्हतं केलं' म्हणताच अश्रूंचा बांध फुटला; खासदार सुळेही झाल्या स्तब्ध

राजकुमार थोरात
Friday, 16 October 2020

खासदार सुळे यांनी सांगितले की, पंचनामे सुरु झाले असून जास्तीजास्त मदतीसाठी शासनाचा प्रयत्न राहिल.

वालचंदनगर : ताई घरातील भांडी, धान्य, कपडे सगळं पावसाच्या पाण्याने वाहून गेलं हो...पावसाच्या पाण्याने होत्याचं नव्हत केलं... ताई गेल्या आठवड्यामध्ये दुकानाचे उद्घाटन झाले होते. पावसाच्या पाण्याने नवीन तयार केलेल्या बॅग (पिशव्या) सगळचं वाहून गेले असून मोठे नुकसान झाले आहे. हे शब्द सणसर मधील महिलांचे...खासदार सुप्रिया सुळे यांनी आज शुक्रवार (ता. १६) रोजी सणसर गावामध्ये नुकसानग्रस्त नागरिकांची भेट घेतली.

सिगारेट ओढण्यास नकार दिल्याने जीवे मारण्याची धमकी; तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

दरम्यान, बुधवार (ता. १४) इंदापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाउस झाला असून ओढे, नद्यांना पूर आला होता. पूराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची पिके, नागरिकांच्या घरातील वस्तू वाहून गेल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी सणसर गावाला भेट दिली. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यासह प्रशानातील अधिकारी उपस्थित होते.

मजूरी करणाऱ्या महिलांनी पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानाची व्यथा मांडली. सर्वच साहित्य, धान्य, कपडे वाहून गेले असून, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. घराच्या भिंती पडल्या असून, गेल्या दोन दिवसांपासून लाईट नाही, पाणी ही नसल्याचे सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी खासदार सुळे यांनी सांगितले की, पंचनामे सुरु झाले असून जास्तीजास्त मदतीसाठी शासनाचा प्रयत्न राहिल. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे ही वाड्यावस्तीवर जावून नागरिकांच्या अडचणी जाणून घेत आहेत. नागरिकांना अन्न, पाणी व कपडे पोहचविण्याचे काम सुरु आहे. केंद्र सरकारकडे मदतीसाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठपुरावा सुरु केला असून केंद्राने ही राज्याला विशेष पॅकेजची तातडीने  देण्याची गरज आहे. विरोधकांनी राजकारण बाजूला ठेवून जनतेला मदत करण्याचे आवाहन केले. 

Pune Rain : अनेकांसाठी ठरली रात्र वैऱ्याची; पाणी घरांत घुसल्याने नागरिकांना भरली धडकी

आठ दिवसांपूर्वीच्या दुकानाचे झाले होत्यांचे नव्हते...
आठ दिवसांपूर्वी सणसरमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये कल्पना धोत्रे यांनी मयुरेश्‍वर बचत गटाच्या माध्यमातून कलमकारी पिशवी (बॅग)च्या निमिर्ती व विक्रीचे दुकान सुरु केले होते. मात्र पावसाने होत्याचे नव्हते केले. दुकानातील सर्व नवीन तयार बॅगा, कापड वाहून गेले असून मशिनही खराब झाल्या आहेत. तसेच मुलाचा डिजीटल कॅमेराही खराब झाला आहे. कल्पना धोत्रे यांच्या  डोळ्याती अश्रू पाहुन सुळे ही स्तब्ध झाल्या. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Supriya Sule inspects flood-affected areas in pune district