अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना दिला शब्द

राजेंद्रकृष्ण कापसे
Tuesday, 23 June 2020

खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मुंबई येथे भेट घेऊन विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली

खडकवासला, ता. २३ :  खासदार सुप्रिया सुळे यांनी खडकवासला मतदार संघातील विविध समस्या व त्यावरील उपाय योजनासाठी काय नियोजन करता येतील यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मुंबई येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि निवेदन दिले. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खडकवासला ग्रामीणचे अध्यक्ष त्रिंम्बक मोकाशी उपस्थित होते.

कोरोनाचे डॉक्‍युमेंटेशनसाठी अभ्यास गट नेमणार, राज्य सरकारचा निर्णय

मतदार संघात विविध योजनांच्या माध्यमातून अनेक विकास कामे सुरू आहेत. त्यातील अडचणी व मतदार संघातील अनेक काही प्रश्नांबाबत खासदार सुप्रिया यांनी ही भेट घेतली खडकवासला मतदार संघातील रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. पाणी पुरवठा, ड्रेनेजलाईन, लॉकडाऊन कालावधीतील शालेय मुलांच्या अडचणी, बाजार पेठा बंद असल्याने यावर चर्चा झाली. दैनंदीन कामकाज बंद असल्याने नागरिकांची होत असलेली गैरसोय याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करून मार्ग काढण्याबाबत विनंती करण्यात आली. 

अभ्यासक्रम बदलल्यानंतर प्राध्यापकांना माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली जाते, पण...

खडकवासला मतदार संघातील प्रश्नांबाबतही यावेळी चर्चा झाली. यामध्ये मतदारसंघात विविध विकास योजनांसाठी पुरेसा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. यावर योग्य मार्ग काढण्यात येईल, असा शब्द अजित पवार यांनी दिल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मतदार संघातील काही गावात नागरिक हिताची तातडीने काही कामे करावयाची आहेत. काही वाड्यावस्त्यावर विकासकामांसाठी निधीची मागणी देखील अजित पवार यांच्याकडे केली. त्यांनी पुण्यात आल्यावर भेटण्यास सांगितल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खडकवासला ग्रामीणचे अध्यक्ष त्रिंम्बक मोकाशी यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP supriya sule meet deputy cm ajit pawar