mp supriya sule
sakal
बारामती - दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील पाणीप्रश्न, चारा आणि अन्य महत्त्वाच्या विषयांचा खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी (ता. 20) आढावा घेतला.
बारामतीच्या प्रशासकीय भवन येथे माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या, दर महिन्याला बारामतीतील विविध प्रश्नांचा आढावा घेत असते. मात्र, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने त्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.