Supriya Sule : भाजपचे राजकारण सुदृढ लोकशाहीला घातक; खासदार सुप्रिया सुळे

महाराष्ट्रात सहा नंबरचे जोतिर्लिंग पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर आहे
Supriya Sule
Supriya Sulesakal

माळेगाव : महाराष्ट्रात सहा नंबरचे जोतिर्लिंग पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर आहे. ते जोर्तिलिंग भाजप विचाराचे आसामचे मुख्यमंत्री पळवू इच्छितात. महाराष्ट्रातही शिवसेना पक्ष आणि धनुष्यबान चिन्हाची पळवापळवी भाजपवाल्यांनीच केली.

सुदृढ लोकशाहीला असले कुटील राजकारण घातक ठरत आहे. एकाबाजूला अंगणवाडीचे सेविका, एमपीएस्सीचे विद्यार्थी रस्त्यावर आंदोलने करतात.

बेरोजगारी, एसटी चालकांच्या आत्महत्या होत असताना दुसऱ्याबाजूला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री-उपमुख्यंत्री केवळ सत्तासंर्घात गुंतल्याचे जनता उघड्या डोळ्याने पाहते, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणविस या राज्यकर्त्यांना लक्ष केले.

महाराष्ट्र भाजपवाल्यांना मतपेठीद्वारे धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असाही इशारा यावेळी सुळे यांनी माळेगाव (ता.बारामती) येथे राज्यकर्त्यांना दिला.

बारामती तालुका गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे या माळेगाव बुद्रूक येथे आल्या होत्या. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

महाराष्ट्रात सध्या सुरू असेला सत्तेचा सारीपाट जनतेच्या दृष्टीने नुकसानिचा आणि वेदनादायी आहे, असे सांगून सौ.सुळे म्हणाल्या,`` एमपीएसीच्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी गेले नाहीत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे केवळ राजकारणात गुंतले आहेत.

शिवसेना संपविणे, महागाई, शेतकरी आंदोलन, एसटी चालक आत्महत्या, सावित्रीबाई फुले विद्यापीठात आंदोलन, अंगणवाडी महिलांचे आंदोलन सुरू असताना राज्यकर्ते निवडणूकांचा प्रचार, कोर्ट मॅटर, खुर्चीसाठी लढाई आणि सत्ता वाचविण्यासाठी आमदारांना खोक्यांचा वापर करून आपलेसे करण्यात दंग आहेत.

यामध्ये जनतेचे प्रचंड हाल होताना दिसत आहे.`` पुण्यात निवडणूका सुरू असताना आनंदाचा सिदा वाटप करण्याचा निर्णय कितपत योग्य आहे,असे विचारले असता सौ. सुळे म्हणाल्या,`` खरेतर निवडणूक आयोगाला हे कसे दिसत नाही.

यापुर्वीही हा निर्णय घेताना जनतेला राज्यकर्त्यांच्या श्रेयवादामुळे सिदा वेळेत मिळाला नव्हता आणि आताही तिच स्थिती पुढे येत आहे. राजकारणाचा विचार करून धोरणे आखण्याची पद्धत या राज्यकर्त्यांनी पुढे आणली.

उद्योग व्यवसाय इतर राज्यात गेल्याने बेरोजगारी वाढली. यावर न बोलता हजारो युवकांना नोकऱ्या देण्याच्या घोषणा सरकार करती आहे.

परंतु निधी अभावी या घोषणा हवेत विरघळत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या घरी सहा महिन्यात अडीच कोटींचे जेवणावर खर्च, जाहिरातींवर कोट्यांवधी रुपयांचा खर्च करण्यात हे सरकार मागे पुढे पहात नाही.

सुप्रिय कार्टातील सुनावणीबाबत सुळे म्हणाल्या,``सत्यमेव जयते, सत्याचा विजय होईल.बाळासाहेब ठाकरे हायात असतानाच त्यांनी आपले उत्तराधिकारी उद्धव ठाकरे असतील असे सांगितले होते. त्या मिटींगला राज ठाकरेही उपस्थित होते. त्यानंतर राज ठाकरे यांचे मतभेद झाले तरी यांनी स्वतःचा पक्ष काढला.

शिंदे सारखे ते शिवसेनेमध्ये ओरभडत बसले नाहीत.`` माळेगावचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, संभाजी होळकर, दत्तात्रेय येळे, माजी सरपंच दिपक तावरे, योगेश जगताप, रविराज तावरे, मदनराव देवकाते, धनवान वदक,

विलास तावरे, रणजित तावरे, अविनाश भोसले, रमेश गोफणे, माया खोमणे, वसंतराव तावरे, वनिता बाबर, संगिता पाटोळे, इमत्याज शेख, अँड. राहुल तावरे, अनिल वाघमोडे आदींनी विविध मुद्यांवर मते मांडली.

माळेगावात उपस्थित केलेली विकास कामे

सुप्रिया सुळे यांच्या पुढे माळेगावात विविध विकास कामांबाबत उहापोह झाला. त्यामध्ये माळेगाव-बारामती राज्यमार्गावरील दुभाजक,

शिवाजी चौकातील पेवर्सचे काम,पारधी समाज वस्तीमधील सेवासुविधा,अपंगांना निधी वाटप, माळेगावचे १० लाख टन ऊसाचे गाळप पुर्ण आदी मुद्यांच्या आधारे सुळे यांचे उपस्थितांनी लक्ष वेधले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com