साबळेवाडीत सुप्रिया सुळेंनी साधला ग्रामस्थांशी संवाद

संतोष आटोळे
शनिवार, 7 जुलै 2018

शिर्सुफळ (पुणे) : बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे साबळेवाडी (ता.बारामती) येथील ग्रामस्थांनी संवाद साधला व मतदार संघातील अडीअडचणी जाणुन घेतल्या. यावेळी त्यांच्या हस्ते आमदार अजित पवार यांच्या निधीतुन बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या कामाचे तसेच व्यायामशाळेचे उद्घाटन तसेच वाघजाई मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. 

यावेळी बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, उपसभापती शारदा खराडे, पंचायत समिती सदस्य लिलाबाई गावडे, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संभाजी होळकर, राहुल वाबळे, राजेंद्र काटे, उपसरपंच व बारामती तालुका दुधसंघाचे संचालक संजय गाडेकर, विकास सोसायटीचे माजी चेअरमन अरविंद गुळुंमकर, विशाल गाडेकर, गौतम शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुळे म्हणाल्या, बारामती मतदारसंघातील मतदार गेल्या अनेक वर्षापासुन पवार कुटुंबाच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहेत.हे प्रत्येक वेळेच्या निवडणुक निकालावरुन दिसुन येत आहे. यामुळे पक्षाकडुनही बारामतीच्या विकासासाठी कसलही कमरता निर्मान होऊ दिली नाही.यामुळे देशात सर्वत्र बारामती विकासकामांचे कौतुक होते. यासाठी आपण सर्वांनी दिलेली साथ महत्वाची असल्याचे सुळे यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आपल्या विविध मागण्या सुळे यांच्याकडे मांडल्या.

सरपंचासह सदस्यही गैरहजर..
यावेळी खासदार सुळे यांच्या गावभेट दौऱ्या दरम्यान येथील ग्रामपंचायतीच्या विद्यामान सरपंच भारती अशोक भगत, नवनिर्वाचित सरपंच गणेश शिंदे यांच्यासह जुने तसेच नविन ग्रामपंचायत सदस्य या कार्यक्रमाला गैरहजर होते. यामुळे बारामती मतदारसंघात असुनही सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकाऱ्यांनी का दांडी मारली हा चर्चैचा विषय ठरला.

Web Title: mp supriya sule talks with sabalewadi citizens