esakal | Video: नाद करायचा नाय, ब्लॅकबेल्ट राहुल गांधींचा व्हिडिओ व्हायरल!
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul_Gandhi

विद्यार्थ्यांनी दिलेलं पुश-अप्सचं चॅलेंज त्यांनी स्वीकारलं आणि त्याची चर्चा सध्या देशभरात सुरू झाली आहे. 

Video: नाद करायचा नाय, ब्लॅकबेल्ट राहुल गांधींचा व्हिडिओ व्हायरल!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

चेन्नई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेले राहुल गांधी (Rahul Gandhi) हे गेल्या काही दिवसांपासून दक्षिण भारताच्या दौऱ्यावर आहेत. केरळमधील मच्छीमारांसोबत समुद्रात डुबकी मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या बॉक्सर अॅब्ज फिटनेसची चर्चा सोशल मीडियात सुरू झाली होती. त्यानंतर राहुल गांधींचे आज दोन व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत, ज्याची तरुणांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. 

तमिळनाडूमध्ये जोरदार प्रचाराची धामधूम सुरू आहे. यादरम्यान राहुल यांनी एका शाळेला भेट दिली. त्यावेळी तेथील उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी फिटनेसची प्रात्यक्षिके करून दाखवली. विद्यार्थ्यांनी दिलेलं पुश-अप्सचं चॅलेंज त्यांनी स्वीकारलं आणि त्याची चर्चा सध्या देशभरात सुरू झाली आहे. 

PM मोदींना तमिळ येत नसल्याची खंत, पण राहुल गांधींनी करुन दाखवलं?​

तमिळनाडूच्या मुलागुमुदूबनमध्ये सेंट जोसेफ मॅट्रिक हायस्कूलमधील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. दहावीत शिकणाऱ्या मेरोलिन या विद्यार्थीनीनं त्यांना चॅलेंज केल्यानंतर ते पुश-अप्स करताना दिसून आले. ४० सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये वयाची पन्नाशी ओलांडलेल्या राहुल यांनी दाखवलेले व्यायामाचे प्रात्यक्षिक सध्या कौतुकाचा विषय बनले आहे.  

पुश-अप करण्याव्यतिरिक्त त्यांनी मार्शल आर्ट प्रकार आयकिडोमध्ये आपण पारंगत असल्याचे दाखवून दिले. आयकिडो हा जपानी मार्शल आर्टचा एक प्रकार आहे. विशेष म्हणजे या मार्शल आर्ट प्रकारात त्यांनी ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. त्यांनी २०१३मध्ये जपानमध्ये जाऊन याचे प्रशिक्षण घेतले आहे.

 तमिळनाडूत दिलखुलासपणे नाचत, व्यायाम करत राहुल गांधींचा प्रचार; जिंकली उपस्थितांची मने

आयकिडो म्हणजे काय?
जगभरात सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या मार्शल आर्टचा हा एक प्रकार आहे. तलवार, चाकू शस्त्र चालवणे, जॉईंट-लॉकिंग, स्ट्राइकिंग यासारख्या तंत्रांचा यामध्ये समावेश होतो. 

VIDEO : पहा भगतसिंह, टिळक आणि विवेकानंदांचे हुबेहुब हावभाव; AI टेक्निकची अद्भूत कमाल​

या क्रीडा प्रकार शत्रूला मारहाण करण्यासाठी नाही, तर कमीत कमी ताकद वापरून त्याच्यावर ताबा मिळवण्यासाठी ओळखला जातो. आयकिडो ही एक प्रभावी स्व-संरक्षण कला असून संघर्ष टाळण्यास आणि शांततापूर्ण पद्धतीने परिस्थिती हातळण्यासाठी वापरली जाते. 

दरम्यान, राहुल गांधी दक्षिणेतील लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच त्यांची भाषाही शिकत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी तमिळनाडूच्या गावातील लोकांसोबत मशरुमची बिर्याणी बनवत त्याचा गावकऱ्यांसोबत आस्वाद घेतला. तसेच त्यांच्यासोबत तमिळमधूनही संवाद साधला. हा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला होता.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)