

MPSC Paper Leak
Esakal
MPSC Drug Inspector Paper Leak : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी घेण्यात आलेली संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या प्राथमिक चौकशीत एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. त्यामुळे आयोगाने फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.