MPSC cancels the Drug Inspector recruitment process after a preliminary police inquiry found that a candidate had allegedly received the question set before the examination.
esakal
प्रज्वल रामटेके
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक (गट-ब) पदाच्या भरती परीक्षेत पेपरफुटी आणि गैरप्रकार झाल्याच्या चर्चांना अखेर दुजोरा मिळाला आहे. या परीक्षेतील गैरप्रकाराच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या प्राथमिक चौकशीत एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचे आणि त्याचा लाभ झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. त्यामुळे ‘एमपीएससी’ने अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक पदाची संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द केली आहे.