MPSC Chairman Vivek Bhimanwar
sakal
पुणे - ‘एमपीएससी’ पेपरफुटीप्रकरणी माझ्याविरोधात सातत्याने वैयक्तिक आणि प्रतिमा मलिन करणारे राजकीय आरोप केले जात आहेत. औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीचा घटनाक्रम माझ्या पदभार स्वीकारण्यापूर्वीचा आहे. या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच आयोगाने पोलिसांत तक्रार केली असून, तपास सुरू आहे, असे एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी स्पष्ट केले. तसेच ‘माझ्याविरोधात कुणी एक जरी पुरावा दिला, तर एक क्षणही या पदावर राहणार नाही,’ असेही भीमनवार यांनी सांगितले आहे.