

Maharashtra MPSC Protest Update No Dialogue Between Government and Students as Pune Agitation Enters Eighth Day
sakal
-प्रज्वल रामटेके
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला गुरुवारी (ता. ८) आठ दिवस पूर्ण झाले. मात्र, या कालावधीत आंदोलक आणि राज्य सरकार यांच्यात चर्चेची एकही फेरी झालेली नाही. दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने आंदोलनाचा तिढा कायम आहे. त्यामुळे हे आंदोलन आणखी किती दिवस चालणार आणि त्यावर तोडगा कसा निघणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.