PSI Test : अखेर एमपीएससीने पीएसआयची चाचणी पुढे ढकलली; महिला उमेदवारांना दिलासा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पोलिस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी अखेरीस पुढे ढकलली आहे.
mpsc psi recruitment physical test postponed lok sabha election
mpsc psi recruitment physical test postponed lok sabha electionSakal

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पोलिस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी अखेरीस पुढे ढकलली आहे. अपुरा कालावधी आणि उन्हाचा वाढता प्रकोप, तसेच महिला उमेदवारांच्या बदललेल्या निकषामुळे तयारीसाठी पुरेशा वेळेची मागणी करण्यात आली होती. सकाळनेही यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते.

अखेरिस प्रशासकीय कारणास्तव शारीरिक चाचणी पुढे ढकलल्याणे महिला उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. एमपीएससीकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ या परीक्षेतीस पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) संवर्गाकरीता १५ एप्रिल २०२४ ते २ मे २०२४ या कालावधीत शारीरिक चाचणी आयोजित केली होती.

परंतु लोकसभा निवडणुकीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे एमपीएससीने बुधवारी (ता. ४) घोषणी पत्रकाद्वारे जाहीर केले. मात्र यावेळी देखील एमपीएससीने शारीरिक चाचणी कधी घेतली जाणार याची तारीख मात्र जाहिर केली नाही. सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. असे एमपीएससीने जाहीर केलेल्या घोषणा पत्रकात नमूद केले आहे.

एमपीएससीने लोकसभा निवडणुकांमुळे पीएसआयची शारीरिक चाचणीची परिक्षा ही १५ ते २७ एप्रिल दरम्यान आयोजित केली होती. तसेच १९, २६ आणि २७ एप्रिल रोजी होणारी शारीरिक चाचणीची परिक्षा ही २९, ३० एप्रिल आणि ०२ मे २०२४ रोजी पोलीस मुख्यालय नवी मुंबई येथे होणार असल्याचे जाहीर केले होते.

त्यामुळे उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु आता विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांनी मैदानी चाचणी घेणे शक्य नसल्याचे कारण देत ती पुढे ढकलली आहे. लोकसभा निवडणुकीमुळे पोलिसांसह सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे कामकाज दिले जाते. याची प्रत्येक विभागाल माहिती असते. तरी देखीस एमपीएससीने कोणतेही नियोजन करता सरसकट ताराख जाहीर करुन ढिसाळ नियोजनाचे प्रदर्शन दाखविले, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

महिला उमेदवारांना दिलासा...

पीएसआयच्या शारीरिक चाचणीच्या निकषांमध्ये २०२१ मध्ये बदल करण्यात आला होता. उमेदवारांना तयारीसाठी एक वर्ष मिळाले असतानाही त्यावर्षी ११२ जागांपैकी फक्त ६४ मुली पात्र ठरल्या होत्या. आता तर फक्त एक महिन्याचाच कालावधी मिळाला आहे. १३ मार्च रोजी मुख्य परीक्षेचा निकाल लागला होता.

एका महिन्यातच शारीरिक चाचणीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नवे निकष महिला उमेदवारांसाठी बदलले असून, इतर राज्यांच्या तुलनेत ते अवघड आहे. अपुऱ्या वेळेत आणि वाढत्या उन्हाळ्यात ही तयारी करणे जवळपास अशक्य आहे.

महिला उमेदवारांचा मागील भरतीत टक्का घसरला आहे. तसेच २०१५ ते २०२१ या दरम्यान कधीही एमपीएससीने भर उन्हाळ्यात अशा प्रकारची परीक्षा घेतली नाही. परीक्षा कालावधी जरी सकाळचा असला तरीही त्यासाठी लागणारा सराव दररोज उन्हात करावा लागत आहे, असेही उमेदवारांचे म्हणणे होते.

मैदानी चाचणीमध्ये झाल्याने महिला उमेदवार तणावाखाली होत्या. अवघ्या एका महिन्यात मैदानी चाचणी होणार होती, त्यामुळे आता ही चाचणी पुढे ढकलल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. एमपीएससीने विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करण्यासाठी पुढे ढकलेल्या परीक्षांच्या तारखा लवकरात लवकर जाहीर कराव्यात.

- महेश बडे, प्रमुख स्टूडंट्स राईट्स असोसिएशन

पीएसआय पदाची मैदानी चाचणी पुढे ढकलण्याची मागणी महिला उमेदवारांनी केली होती. त्याला नकार देत एमपीएससीने नवीन तारखा जाहीर केल्या होत्या. मात्र विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या आदेशाने का होईना मैदानी चाचणी पुढे ढकलली, यामुळे तरी आता या उमेदवारांना मोठा दिलासा मिळेल.

- महेश घरबुडे, कार्याध्यक्ष- स्पर्धा परीक्षा समन्वय समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com