एमपीएससीने अभियांत्रिकी मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदत वाढ द्यावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC Declared Result
एमपीएससीने अभियांत्रिकी मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदत वाढ द्यावी

एमपीएससीने अभियांत्रिकी मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदत वाढ द्यावी

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) महाराष्ट्र तांत्रिक सेवा ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलो आहे. मात्र अभियांत्रिकी शाखेच्या पदवीचा अंतिम वर्षाचा निकाल अद्याप जाहीर झाला नसल्याने मुख्य परीक्षेसाठी अर्ज करता येणार नाही. त्यामुळे एमपीएससीने या परीक्षेच्या अर्ज सादर करण्यास मुदत वाढ द्यावी, अशी मागणी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या रोहितसह इतर विद्यार्थ्यांनी केली आहे.

एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी पदवीच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येतो. या नियमाला अनुसरुन आम्ही विद्यार्थ्यांनी तांत्रिक सेवा या परीक्षेसाठी अर्ज सादर केला. परीक्षेचा प्रामाणिक अभ्यास केल्याने पूर्व परीक्षेत यश मिळाले. मात्र मुख्य परीक्षेला अर्ज सादर करताना पदवी प्राप्त करणे बंधनकारक आहे. पदवीचा निकाल ऑगस्ट महिन्यात जाहीर होणार आहे. तर मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याची २९ जुलै ही अंतिम तारीख आहे. केवळ १० ते ११ दिवसांमुळे आमची मुख्य परीक्षेची संधी हुकणार आहे. त्यामुळे एमपीएससीने आमच्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांचा विचार करुन अर्ज सादर करण्यास मुदत वाढ द्यावी. असे मंदार या विद्यार्थ्याने सांगितले. याबाबत एमपीएससीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

पदवी प्राप्त केलेल्या नवोदित विद्यार्थ्याला मुख्य परीक्षेची संधी मिळणार आहे. या परीक्षेत यश मिळाल्यास पदवीनंतर लगेचच नोकरी मिळू शकते. त्यामुळे केवळ एमपीएससीने १० ते १५ दिवासांमुळे आमचे नुकसान होणार नाही, याचा विचार करावा.

- तुषार, विद्यार्थी.

मुख्य परीक्षा २९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. २९ जुलै नंतर किमान तीन महिने परीक्षा पुढे राहते. त्यामुळे एमपीएससीला पुरेशा प्रमाणात वेळ आहे. राज्य सेवा परीक्षेला अर्ज सादर करण्यास मुदत वाढ देण्यात आली. त्याप्रमाणे आमच्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होणार यासाठी एमपीएससीने विचार करावा.

- राजेश, विद्यार्थी.

महाराष्ट्र तांत्रिक सेवा २०२१ ची जाहिरात - १८ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द

एकुण- ५८८ पदे

पूर्व परीक्षा - ३० एप्रिलला झाली.

पूर्व परीक्षेचा निकाल - १२ जुलैला जाहीर

मुख्य परीक्षेचा अर्ज करण्याची अंतिम तारीख - २९ जुलै

मुख्य परीक्षा - २९ ऑक्टोबर

Web Title: Mpsc Should Extend Deadline For Submission Of Applications For Engineering Main Examination

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top