

mpsc exam
esakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या (एमपीएससी) परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणामुळे आगामी ‘राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६’च्या प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेबाबतही उमेदवारांमध्ये संशय निर्माण झाला आहे. वादग्रस्त ठरलेल्या तत्कालीन अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातच या प्रश्नपत्रिका तयार झाल्या असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांचा आयोगावरील विश्वास कायम ठेवण्यासाठी या परीक्षेचे पेपर नव्याने सेट करावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.