Pune MPSC Protest: आंदोलनाच्या चौथ्या दिवशीही आंदोलनाची धग कायम; आंदोलनाच्या चौथ्या दिवशीही नेत्यांची रीघ, परीक्षा पद्धतीवरून विद्यार्थ्यांमध्ये मतभेद

MPSC Student Agitation Gains Momentum in Pune on Day Four: एमपीएससी परीक्षा पद्धतीवरून विद्यार्थ्यांमध्ये मतभेद; आंदोलनाला राजकीय नेत्यांचा पाठिंबा
MPSC Students Protest in Pune Leaders Extend Support as Students Differ Over Objective and Descriptive Exam Pattern

MPSC Students Protest in Pune Leaders Extend Support as Students Differ Over Objective and Descriptive Exam Pattern

esakal

Updated on: 

-प्रज्वल रामटेके

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची धग चौथ्या दिवशीही कायम राहिली. गरवारे महाविद्यालयाजवळील एस. एम. जोशी पूल, लालबहादूर शास्त्री रस्ता आणि टिळक चौक अशा तीन ठिकाणी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू असून, दिवसेंदिवस त्याला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. रविवारी विविध राजकीय नेत्यांनी आंदोलनस्थळी भेटी देत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिल्याने आंदोलनाला आणखी धार आली. घोषणाबाजी, नेत्यांची भाषणे आणि मागण्यांवर ठाम असलेल्या विद्यार्थ्यांमुळे आंदोलनस्थळावरील वातावरण दिवसभर तापलेले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com