MPSC protest: शरद पवारांच्या भेटीनंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फूट?

शरद पवार यांनी रात्री ११ वाजता MPSC विद्यार्थ्यांशी साधला संवाद
MPSC protest
MPSC protest

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२५ पासून करावी या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांचे बालगंधर्व चौकात आंदोलन सुरू असताना आज रात्री अकराच्या सुमारास अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या विद्यार्थ्यांची आंदोलनस्थळी भेट घेतली. पवारांच्या मध्यस्थीनंतर तोडगा निघाला पण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फूट पडली आहे.

एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गटबाजी झाल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फूट पडली असल्याचं बोललं जात आहे. काल शरद पवारांनी भेट दिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलनातून माघार घेतली मात्र अजूनही काही जणं आंदोलनावर ठाम आहेत.

MPSC Protest : तिसऱ्या दिवशीही MPSC चे विद्यार्थी आंदोलनावर ठाम; जोपर्यंत...

आज सकाळपासून आंदोलनात विद्यार्थ्यांची संख्या तुरळक दिसून येत आहे. नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांच उपोषण आणि आंदोलन सुरूच राहणार, उपस्थित विद्यार्थ्यांनी पवित्रा घेतला आहे.

काल रात्री उशीरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यानंतर आंदोलन स्थळावरुनच शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी विद्यार्थ्यांच्या मागण्याबाबत फोनवरुन संवाद देखील साधला होता. मात्र, त्यानंतरही विद्यार्थ्यी आंदोलनावर ठाम आहेत.

MPSC protest
Sharad Pawar News : "८३ वर्षांचा योद्धा विद्यार्थ्यांसाठी मैदानात"; पवारांची कमिटमेंट पाहून नेटकरी भारावले

आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. आमच्या मागणीची अधिकृत नोटीस काढल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी यावेळी माडंली आहे. आम्ही जेव्हा जेव्हा आंदोलन केलं तेव्हा तेव्हा आम्हाला फक्त आश्वासन दिलं गेलं.

पण अधिकृत नोटीस निघाली नसल्याचं मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री दोन-दोन तीन-तीन दिवस पुण्यात राहतात. मात्र, आंदोलक विद्यार्थ्यांना भेटत नसल्याची खंत विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com