

MPSC Students Protest
esakal
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आज पुण्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.पेपरफुटी, भरती प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात झाली असून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना होत आहे. यात महाविकास आघाडीचे अनेक नेते देखील सहभागी झाले आहेत.