
MPSC Students: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांनी आज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरुन ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. अचानक विद्यार्थ्यांनी शास्त्री रस्त्यावर आंदोलन सुरु केल्यानं, इथली वाहतूक विस्कळीत झाली आहे. पण यामुळं पोलिसांची मात्र धावपळ उडाली.