Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

MPSC Students Suspend October 2 Pune Satyagraha: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना सरकारची मान्यता; अध्यक्षांवर न्यायालयीन चौकशी, सचिवांची तत्काळ बदली आणि सर्व परीक्षा ऑफलाइन घेण्याचे आश्वासन
Pune MPSC Students Put October 2 Satyagraha on Hold After CM Fadnavis Meeting on Recruitment Exams and Pending Demands

Pune MPSC Students Put October 2 Satyagraha on Hold After CM Fadnavis Meeting on Recruitment Exams and Pending Demands

esakal

Updated on: 

-प्रज्वल रामटेके

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराविरोधात आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यात २ ऑक्टोबर रोजी पुकारण्यात आलेले ‘सत्याग्रह’ आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमपीएससी विद्यार्थी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाची बुधवारी मंत्रालयात बैठक झाली असून, विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. एमपीएससीच्या सचिवांची लवकरच बदली होणार असून, आयोगाच्या अध्यक्षांची न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे आश्वासन फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना दिले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com