महाराष्ट्र नागरी सेवा संधी आणि आव्हाने

सुहास कोकाटे
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

‘यू-ट्यूब’वर शिवनेरी अॅकॅडमीचे चॅनेल आहे. शिवनेरी अॅकॅडमी  (shivneri academy)  या नावाने सर्च केल्यानंतर या अभ्यासक्रमांचे व्हिडिओ लेक्‍चर्स पाहायला मिळतील. संबंधित स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्‍चर्स यावर असून, डिजिटल तंत्र घेणाऱ्या उमेदवारांना चालू घडामोडींसाठी संस्थेकडून वैयक्तिकरीत्या व्हॉट्‌सअॅप अथवा ई-मेलवर प्रत्येक आठवड्याला मार्गदर्शन केले जाईल. 

  • नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क - ७३५०००१६१७
  • (सकाळी १० ते सायंकाळी ६ - रविवार वगळता) 

देशात शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेले राज्य ही महाराष्ट्राची ओळख. या राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा, पीएसआय, एसटीआय, आयएसओ अशा प्रकारच्या राजपत्रित व अराजपत्रित पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये महाराष्ट्रातून लाखो तरुण बसतात. पदवीचा अभ्यासक्रम करतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यामागे आयुष्यात मोठ्या पदावर जाण्याचे स्वप्न साकार करण्याची तीव्र इच्छा उमेदवारांना असते. समाजात मिळणारे मान, समाजसेवेची संधी ही कारणे यामागे आहेत.

पारंपरिक पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणातून करिअर करण्याकडे आजच्या पिढीचा कल आहे, पालकांचीही तीच इच्छा असते. मात्र या विचारसरणीला छेद देत स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा भरती यांकडे योग्य पर्याय म्हणून आजची पिढी पाहते. राज्यात लाखो विद्यार्थी अधिकारी बनण्याचे स्वप्न घेऊन अभ्यासाची तयारी करतात, मात्र खोलवर विचार केल्यास करिअरचे पर्याय निवडताना त्यातील संधी व आव्हाने यांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, असेच दिसते.

या परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थी पहिल्या अथवा दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी होताना दिसतात. मात्र काही विद्यार्थ्यांना चार ते पाच वर्षे किंवा यापेक्षाही जास्त कालावधी लागतो. त्यामुळे विद्यार्थ्याच्या मनावर येणारे दडपण, मित्र, आप्तेष्टांकडून केली जाणारी विचारणा, पुढच्या परीक्षेत नक्की यशस्वी होईल ही आशा आणि कुटुंबीयांच्या अपेक्षा यांमध्ये विद्यार्थी गुरफटत जातो.

‘शिवनेरी फाउंडेशन’ने राज्यातील अशा विद्यार्थ्यांचा अभ्यास केला. यामध्ये अनेक बाबी समोर आल्या. शहरी भागात जाऊन कोचिंग क्‍लासेस लावता येत नाहीत, अभ्यासाची साधने एका जागेवर न मिळाल्याने अनेकविध साहित्य अभ्यासावे लागते, खूप जास्त अभ्यासामुळे ताणही वाढतो.

घरबसल्या परीक्षेचा अभ्यास करता येऊ शकेल असे साहित्य उमेदवारांकडे नसते, हेही हे दिसून आले. त्यातून या उमेदवारांना योग्य मार्गदर्शन देऊन अभ्यासाचा आराखडा दिल्यास प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण होणे आवाक्‍यातील गोष्ट आहे, ही बाब जाणून घेत ‘शिवनेरी फाउंडेशन’ने डिजिटल तंत्र तयार केले असून, ते राज्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याचे काम सुरू आहे.

उमेदवारांना फायदेशीर ठरणाऱ्या या तंत्राची माहिती आम्ही देणार आहोत. तत्पूर्वी कमी कालावधीत यशस्वी होणारे विद्यार्थी व माझ्यामध्ये नेमका फरक कोणता आहे, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगणे आवश्‍यक आहे. कोणताही विद्यार्थी अठरा महिन्यांच्या कालावधीत सहजपणे चांगल्या प्रयत्नांनी यशस्वी होऊ शकतो, हे आमचे मत आहे. अर्थात, हे कसे शक्‍य आहे? त्यासाठी काय करावे लागेल, हे प्रश्न आपोआप समोर येतील. त्यासाठी काही मुद्दे!

पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी होतात कसे?
कमी कालावधीत उत्तीर्ण होणारे व अनेक वर्षे अभ्यास करूनही अपयश पदरी पडणारे विद्यार्थी यांच्यात अभ्यासाची नेमकी पद्धत व स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा वेगवेगळा दृष्टिकोन हा फरक आहे. कमी प्रयत्नात यशस्वी होणारे विद्यार्थी अभ्यासाच्या पद्धतीतील टप्पे समजावून घेतात, परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रमाचे नेमकेपण समजून घेऊन परीक्षेविषयी सखोल व योग्य माहिती मिळवतात. प्रश्नपत्रिकांचे स्वरूप, प्रश्न नेमक्‍या कोणत्या पद्धतीने विचारले जात आहेत, मी कोणत्या पद्धतीने वाचन करायचे आहे, कोणकोणती पुस्तके वाचायची आहेत, त्यासाठीचे वेळेचे व्यवस्थापन कसे करावे लागेल याची माहिती ते घेतात. त्यांना अवांतर वाचन, वर्तमानपत्रांचे नियमित वाचन व कात्रणे काढण्याची सवय असते. अभ्यासाची स्वतंत्र शैली म्हणून नियमितपणे गटचर्चा करतात. अभ्यासात नियमितपणा व सातत्य असते. प्रश्नपत्रिकांचे विश्‍लेषण व नेमके वाचन करून ज्या घटकांमध्ये आपण कमी पडतोय त्या घटकांची तयारी करतात. संबंधित घटकाच्या बाबतीतील अद्ययावत घटनांवर ते बारकाईने लक्ष देऊन नमूद करून घेतात.

मित्रांनो, अभ्यासक्रमाचे छोटे-छोटे टप्पे पाडणारे विद्यार्थी उदा. - अर्थशास्त्रामध्ये सहा घटक असतील, तर आज मी या पैकी कोणत्या घटकाची तयारी करणार आहे याचे नियोजन करतात. दररोज मी काय करणार, हे ठरवून छोटे टप्पे घेतात. ते पूर्ण करतात. त्यातून अभ्यासातही सातत्य राहते व ध्येयाकडील वाटचालीचे अंतर कमी होत जाते.

यश न मिळण्यामागे अभ्यासाचे निश्‍चित नियोजन नसणे, कोणती परीक्षा द्यायची आहे याबद्दल एकमत नसणे, राज्यसेवेची परीक्षा आली, की त्याचा अभ्यास, फौजदार, विक्रीकर निरीक्षक, सहायकांच्या जाहिराती आल्या, की पुन्हा त्या पदांच्या अभ्यासाला सुरवात अशा पद्धतीने यशही एकमताने मिळत नाही. परीक्षा आली, की १२ ते १५ तास अभ्यासामुळे आपण वर्षानुवर्षे परीक्षा देत राहतो. गाइडचा जास्तीत जास्त वापर करतो. प्रत्येकवेळी मी अभ्यास केला होता, मात्र पेपर अवघड होता, मेरिट जास्त लागले, अशी कारणे योग्य नाहीत. इतर विद्यार्थी उत्तीर्ण होत असताना मला अपयश का येते, हे प्रामाणिकपणे तपासून आपण कोठे कमी पडतो याचे ठळक मूल्यमापन करावे आणि टाळण्याची सुरवात करावी.

सीइंग इज बिलिव्हिंग!
‘शिवनेरी फाउंडेशन’ने लाखो विद्यार्थ्यांचा विचार केला आणि त्यांना घरबसल्या, स्वतःची कामे सांभाळून, अगदी कोचिंग क्‍लासेसप्रमाणे तज्ज्ञांची व्हिडिओ लेक्‍चर्स उपलब्ध करून दिली आहेत. आपल्याकडे ‘सीइंग इज बिलिव्हिंग’ अशी इंग्रजी म्हण आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपण आपल्या डोळ्यांनी पाहिल्याखेरीज त्याच्यावर विश्‍वास बसत नाही. अलीकडे व्हिज्युअल्स ही संकल्पना अधिक ठळकपणे समोर येत आहे, त्या पार्श्‍वभूमीवर सर्व अभ्यासच मुळात कोणीतरी आपल्याला शिकवतो आहे, अशा दृष्टीनेच अभ्यासायचा अशी ही संकल्पना आहे. अपयशावर मात करण्यासाठी प्रेरणा द्यायची हीच ‘शिवनेरी’ची भावना आहे आणि आत्मविश्वासाने उभा राहणारा उमेदवार ही स्पर्धा परीक्षेतील नवी पिढी पाहायची आहे, म्हणूनच हा पत्रप्रपंच! 
पुढील विषयासह पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूच!

डिजिटल तंत्राचे स्वरूप!
अभ्यास करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना हे तंत्र मोबाईल फोन आणि संगणक किंवा लॅपटॉप अशा दोन साधनांसाठी वापरता येऊ शकेल. अँड्रॉईड मोबाईल फोन असलेल्या उमेदवारांना मायक्रो मेमरी कार्डच्या स्वरूपात ते मिळेल. एकाच मोबाईल फोनवर त्याचे रजिस्ट्रेशन करता येईल. लॅपटॉप किंवा संगणकासाठी मात्र ते यूएसबी पेन ड्राइव्ह स्वरूपात उपलब्ध असेल.

तंत्राची झलक येथेही पाहता येईल...
‘यू-ट्यूब’वर शिवनेरी अॅकॅडमीचे चॅनेल आहे. शिवनेरी अॅकॅडमी  (shivneri academy)  या नावाने सर्च केल्यानंतर या अभ्यासक्रमांचे व्हिडिओ लेक्‍चर्स पाहायला मिळतील. संबंधित स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्‍चर्स यावर असून, डिजिटल तंत्र घेणाऱ्या उमेदवारांना चालू घडामोडींसाठी संस्थेकडून वैयक्तिकरीत्या व्हॉट्‌सअॅप अथवा ई-मेलवर प्रत्येक आठवड्याला मार्गदर्शन केले जाईल. 

नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क - ७३५०००१६१७ (सकाळी १० ते सायंकाळी ६ - रविवार वगळता)

----------------------------------------

माझे प्रयत्न; माझे यश स्वप्ने पाहा, धाडस करा : भाऊसाहेब ढोले

दुलेचांदगाव (ता. पाथर्डी) या खेड्यातून आलेल्या व ‘अधिकारीच होणार’ असा निर्धार केलेल्या आणि त्या दृष्टीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करणारे भाऊसाहेब कैलास ढोले आज नाशिक येथे पोलिस उपअधीक्षक पदाचे प्रशिक्षण घेत आहेत. 

ग्रामीण भागातील तरुणांमध्ये ‘एमपीएससी’ परीक्षेबाबत भीती आहे. पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्येच या परीक्षेच्या अभ्यासाची सोय आहे, असाही एक गैरसमज आहे. हा गैरसमज ढोले यांनी पुसून काढला. आर्थिक परिस्थिती नसल्याने नगरमध्येच त्यांनी अभ्यासाला सुरवात केली. आपल्या या यशाबद्दल ढोले सांगतात, की प्राथमिक शिक्षण दुलेचांदगाव या छोट्याशा खेड्यात झाले. पुढील शिक्षण नगर येथे झाले. ज्येष्ठ पत्रकार कैलास ढोले यांचे ते चिरंजीव. घरातूनही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे उत्साह वाढला.

जिल्हाधिकारीपदी निवड झालेल्या एकाचा सत्काराचा कार्यक्रम गावाकडे होता. तेथे भाषण ऐकले आणि ‘मोठा अधिकारी व्हायचेच’ असा निर्धार केला. भाऊसाहेब म्हणाले, ‘‘संगणकशास्त्राची पदवी मिळविल्यानंतर २०११पासून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागात लिपिक पदावर महाड (जि. रायगड) येथे नियुक्ती मिळाली. मात्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करातच राहिलो. पहिल्याच प्रयत्नात विक्रीकर निरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण झालो. आनंद गगनात मावत नव्हता.’’ 

‘पुण्यात नियुक्ती मिळाली, मात्र त्यात समाधानी नव्हतो. वरिष्ठ अधिकारी व्हायचे हेच स्वप्न होते. पहिल्या दोन प्रयत्नांत अपयश आले. मात्र तिसऱ्या प्रयत्नात पोलिस उपअधीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. लोकसेवा आयोगाला विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षित आहे, तसेच यापूर्वीच्या प्रश्‍नपत्रिकांचा अभ्यास केल्यानेच हे यश मिळाले. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल पाहता, ग्रामीण विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने त्यांनी न्यूनगंड बाळगण्याचे कारण नाही. पुण्यात स्पर्धा परीक्षेचे वातावरण असल्याने निश्‍चित फायदा होतो, मात्र तशी संधी न मिळाल्यास खचून जाऊ नका. आपल्याकडे उपलब्ध साधनांचा उपयोग करून यशस्वी होता येते.

त्यासाठी ध्येय व आत्मविश्‍वास कायम ठेवा. संघर्षच प्रत्येकाला यशापर्यंत घेऊन जातो. त्यासाठी मोठी स्वप्ने पाहा. मी आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणार असून, ‘आयपीएस’ होण्याचे माझे स्वप्न आहे,’’ असा विश्‍वास ढोले यांनी व्यक्त केला.

आधीचे लेख आणि बातम्या :

Web Title: MPSC UPSC exam preparation Sakal Shivneri foundation series part one