बेपत्ता तरुणाचा खून झाल्याचे उघड 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

चिखली - तीन महिन्यांपूर्वी कुदळवाडीतून बेपत्ता झालेल्या तरुणाचा खून झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले. आरोपीने स्वत:च्याच भंगारमालाच्या गोदामात खून करून मृतदेह पुरला होता. उसने पैसे परत देण्यासाठी सारखा तगादा लावत असल्याच्या रागातून आरोपीने खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. 

श्रीराम शिवाजी वाळेकर (वय 26, रा. बालघरे वस्ती, कुदळवाडी, चिखली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी महेबूब आलम मणियार (वय 25, रा. कुदळवाडी) याला पोलिसांनी अटक केली. 

निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेबूबचे वडील आलाम मणियार यांचा भंगारमालाचा व्यवसाय आहे. भंगाराची वर्गवारी करून प्लॅस्टिक बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल तेथे तयार केला जातो. त्यासाठी आलम मणियार याने श्रीराम वाळेकर यांच्याकडून पाच लाख रुपये व्याजाने घेतले होते; परंतु अनेक महिने होऊनही मणियार हे पैसे वाळेकर यांना परत करत नव्हता. पैसे परत देणे जमत नसेल तर व्यवसायात भागिदारी दे, अशी तडजोडही करण्यास वाळेकर तयार होते; परंतु मणियार त्याला तयार नव्हता. तगाद्यामुळे आलम मणियार यांनी श्रीराम वाळेकर यांना पैसे घेण्यासाठी गोदामावर बोलावून घेतले. तेथे महेबूब आणि श्रीराम यांच्यात पैशावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्यावर महेबूबने श्रीराम यांचा धारदार हत्याराने गळा चिरला; तसेच पोटावर शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर प्लॅस्टिकमध्ये मृतदेह गुंडाळला आणि गोदामातच खड्डा खोदून पुरला. 

मुलगा बेपत्ता होण्यामागे आलम आणि त्याचा मुलगा महेबूब असल्याचा संशयही श्रीरामचे वडील शिवाजी यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी दोघांची चौकशी केली होती; परंतु ते गुन्ह्याची कबुली देत नव्हते. त्यानंतर मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास करून आरोपीपर्यंत पोचण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, या खुनात आणखी काही आरोपी असण्याची शक्‍यता असून, त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस निरिक्षक वीरेंद्र चव्हाण यांनी दिली.

Web Title: Mrder of the missing youth