मृणालला पावणेदोन कोटींची शिष्यवृत्ती 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

पुणे - कलेत करिअर करायचे मनाशी ठरवले आणि त्यादृष्टीने प्रयत्न करत गेले, की सगळे काही साध्य होते. नेमके हेच 18 वर्षीय मृणाल खडके हिच्याबाबत झालेय. कला आणि त्याच्याशी निगडित अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तिला दोन वर्षांपूर्वी सिंगापूरमधील महाविद्यालयाची शिष्यवृत्ती मिळाली होती. आता अमेरिकेत बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्टस अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जवळपास पावणेदोन कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीसाठी तिची निवड झाली आहे. मृणाल ऑगस्ट 2018मध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी अमेरिकेला रवाना होणार आहे. 

अमेरिकेतील वरमाउंट येथील बेंनिंगटन कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्टस या चार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी मृणालची निवड झाली आहे. मृणाल सोमवार पेठेतील महापालिकेच्या के. सी. ठाकरे विद्यानिकेतन शाळेची विद्यार्थिनी आहे. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण याच शाळेत झाले. त्यानंतर तिला सिंगापूर येथील युनायटेड वर्ल्ड कॉलेज ऑफ साऊथ ईस्ट एशिया येथे अकरावी आणि बारावीचे शिक्षण घेण्यासाठी ऐंशी लाखांची शिष्यवृत्ती मिळाली होती. सध्या ती सिंगापूरमध्ये वास्तव्यास असून, ऑगस्ट 2018मध्ये अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी जाणार आहे. जगभरातील निवडक विद्यार्थ्यांची या अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येते. अतिशय खडतर अशा निवडप्रक्रियेतून तिची निवड करण्यात आली आहे. याअंतर्गत तिला तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, भाषा, नृत्य यांसह अनेक अभ्यासक्रम शिकायला मिळणार आहेत. 

लहानपणापासून मृणाल शाळेतील स्नेहसंमेलनात उत्साहाने सहभागी होत असे. रंगमंचावर जाऊन कला सादर करण्याची तिला आवड आहे. तिने केवळ अभ्यासावरच लक्ष केंद्रित करावे, असा आग्रह आम्ही पालक म्हणून कधीही धरला नाही. तिला तिच्या आवडीप्रमाणे करिअर करण्याची संधी दिली. दहावीनंतर तिला बारावीच्या शिक्षणासाठी सिंगापूरला जाण्याची संधी मिळाली आणि आता तिला पदवी अभ्यासक्रमासाठी अमेरिकेला जाण्याची संधी मिळत असल्याचा अभिमान आहे. 
- अविनाश खडके, मृणालचे वडील 

Web Title: Mrunal khade got scholarship