MSBSHSE | सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात शैक्षणिक क्षेत्रातील विषयांवर चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात शैक्षणिक क्षेत्रातील विषयांवर चर्चा

MSBSHSE | सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात शैक्षणिक क्षेत्रातील विषयांवर चर्चा

पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशन आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त मंडळाच्या वतीने दोन दिवसाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. हे कार्यक्रम नाशिक येथे १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी होणार असून यामध्ये शैक्षणिक संस्थांच्या विविध समस्यांवर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अशी माहिती महामंडळाचा पुणे विभागाचे विभागीय अध्यक्ष गणपतराव बालवडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा: नक्षलवादाला शहरी चेहरा देण्याचा मिलिंद तेलतुंबडेचा प्रयत्न

या प्रसंगी राज्य कार्यकारिणी सदस्य अजित वडगावकर, विलास पाटील, शरदचंद्र धारूरकर जागृती धर्माधिकारी आणि आझम कॅम्पसच्या आबेदा इनामदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवारी (ता. १५) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर समारोप राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. १६) पार पडेल. या अधिवेशनात कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात येणाऱ्या अनेक अडचणींना दूर करण्यासाठीचे मार्गदर्शन तसेच शैक्षणिक संस्थांना उद्भवणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात येणार आहे.’’ त्यामुळे राज्यातील वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींनी या अधिवेशनात सहभाग घ्यावे असे आवाहन ही यावेळी बालवडकर यांनी केले.

हेही वाचा: हस्ताक्षरावरून पटली ओळख? गडचिरोलीच्या चकमकीत 'ते' चौघे ठार?

वडगावकर म्हणाले, ‘‘शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाची यापूर्वी ११ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे बैठक झाली होती. या बैठकीत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील, आमदार किरण सरनाईक आदी उपस्थित होते. यावेळी विनाअनुदानित धोरण रद्द करत सर्व शाळांना अनुदान द्यावे, पवित्र पोर्टल रद्द करून पूर्वी प्रमाणे शिक्षण संस्थांना शिक्षक भरतीचे अधिकार देणे, शिक्षकेतर कर्मचारी वर्गाची नियुक्ती, सर्व शिक्षण संस्थांना घरगुती दराने आकारावे अशा विविध मागण्यांवर चर्चा झाली. तर या प्रश्‍नांना मार्गी लावण्याचे आश्‍वासन पवार यांनी या बैठकीत दिले. त्याच प्रमाणे आता या अधिवेशनात ही अशा विविध प्रश्‍नांना मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.’’

loading image
go to top