महावितरणची तीन पथके  सांगली व कोल्हापूरला रवाना 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

महापुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत विस्कळित झालेली वीजयंत्रणा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या पुणे परिमंडळातून अभियंते व कुशल तारमार्ग कर्मचाऱ्यांची तीन पथके साधनसामग्रीसह रविवारी (ता. 11) कोल्हापूर, सांगलीकडे रवाना झाली. 

पिंपरी : महापुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत विस्कळित झालेली वीजयंत्रणा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या पुणे परिमंडळातून अभियंते व कुशल तारमार्ग कर्मचाऱ्यांची तीन पथके साधनसामग्रीसह रविवारी (ता. 11) कोल्हापूर, सांगलीकडे रवाना झाली. 

पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या टप्प्यात तीन अभियंते व 16 कुशल तारमार्ग कर्मचारी पाठविण्यात आली आहेत. तातडीची साधनसामग्रीची व्यवस्था म्हणून 315 केव्ही क्षमतेची तीन रोहित्रे, शंभर केव्ही क्षमतेची 46 रोहित्रे, 10-40 अम्पीयर थ्री फेजचे 5160 मीटर तसेच टी अँड पी साधनसामग्री सात ट्रकद्वारे पाठविण्यात आले. 

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी सर्वतोपरी मदत करण्यासाठी शेजारच्या जिल्ह्यातून अतिरिक्त मनुष्यबळ व साधनसामग्री पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पुणे परिमंडळ येथून यापुढे गरजेनुसार मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे. पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक सुनील पावडे पूरग्रस्त भागात मुक्कामी असून, वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामाला वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहे. प्रतिकूल परिस्थितीसोबत मुकाबला करीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी 
वितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mseb team going to kolhapur, sangli district