व्हॉट्सऍपद्वारे धोकादायक वीजयंत्रणेच्या 'इतक्या' तक्रारी दाखल; महावितरणचा नवा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

आतापर्यंत व्हॉट्स‌ऍपद्वारे 88 ठिकाणी वीजयंत्रणा धोकादायक असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी महावितरणच्या संबंधीत कार्यालयांकडून 58 ठिकाणचे दुरुस्ती कामे तातडीने पूर्ण करण्यात आली.

पुणे : धोकादायक वीजयंत्रणेची माहिती किंवा तक्रारी व्हॉट्सऍपद्वारे पाठविण्याच्या महावितरणाच्या आवाहनाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. सोमवारपर्यंत पुणे प्रादेशिक विभागात 200 ठिकाणच्या वीजयंत्रणेसंदर्भात तक्रारी दाखल झाल्या असून त्यामध्ये पुणे परिमंडलातील 88 तक्रारींचा समावेश आहे. 

अॅम्बुलन्स न मिळाल्याने पुण्यात मनसेचे 'खळ्ळ-खट्याक'!​

शहरी आणि ग्रामीण भागातील वीजतारा तुटणे, पोल पडणे किंवा तारा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या आणि फिडर पिलरचे दरवाजे तुटणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे, रोहित्रांचे कुंपण उघडे असणे अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती देण्यासाठी किंवा तक्रार करण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्‍यांसाठी 7875767123 व्हॉट्सऍप मोबाईल क्रमांक महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

आतापर्यंत व्हॉट्स‌ऍपद्वारे 88 ठिकाणी वीजयंत्रणा धोकादायक असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी महावितरणच्या संबंधीत कार्यालयांकडून 58 ठिकाणचे दुरुस्ती कामे तातडीने पूर्ण करण्यात आली. उर्वरित 30 ठिकाणी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी किंवा शिफ्टींगची गरज आहे. परंतु जागेची अडचण आदींमुळे त्यावर कार्यवाही सुरू आहे. 

फुफ्फुसाची कार्यक्षमता ५ टक्के अन् ऑक्सिजनची पातळी ७५; तरीही त्याने कोरोनावर केली मात!​

व्हॉट्सऍपच्या 7875767123 या मोबाईल क्रमांकावर फक्त वीजवितरण यंत्रणेपासून धोका असल्याची फोटोसह माहिती अथवा तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. या मोबाईल क्रमांकावर नागरिकांना कॉल करू नयेत. फक्त धोकादायक यंत्रणेचे स्थळ संपूर्ण पत्यासह किंवा गुगल लोकेशनसह द्यावे. तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉट्सऍप नाहीत त्यांनी 'एसएमएस'द्वारे पत्त्यासह माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे. यासोबतच अशा तक्रारींसाठी महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर थेट संपर्क साधून माहिती देता येणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL customers lodged 200 complaints about dangerous electrical system through WhatsApp