Baramati News : रायरेश्वर पठारावरील रोहित्र बदलण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांची बाजी

कठिण समजल्या जाणा-या रायरेश्वर पठारावरील नादुरुस्त रोहित्र महावितरणच्या कर्मचा-यांनी अवघ्या तीनच दिवसात बदलून कामाप्रती आपली निष्ठा दाखवून दिली.
transformer
transformerSakal

Baramati News: कठिण समजल्या जाणा-या रायरेश्वर पठारावरील नादुरुस्त रोहित्र महावितरणच्या कर्मचा-यांनी अवघ्या तीनच दिवसात बदलून कामाप्रती आपली निष्ठा दाखवून दिली.

2019 मध्ये बसविलेले रोहित्र नुकतेच नादुरुस्त झाले होते. रायरेश्वरावर रोहित्र नेणे हे एक अवघड काम होते. रायरेश्वर किल्ल्यानजिक असलेल्या धानवली व वाघमारे वस्तीवरील केवळ तीस वीजजोडण्या असलेले नादुरुस्त रोहित्र बदलण्यासाठी महावितरणने घेतलेली मेहनत कौतुकास्पद म्हणावी लागेल.

महावितरणच्या ठेकेदाराचे मजूर कामाचे आव्हान पाहून परतल्यानंतर महावितरणच्या हिर्डोशी शाखेचे कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांनी सहा कि.मी.चे डोंगरद-यातील अंतर पार करण्याचे आव्हान स्विकारले.

तीन टप्प्यात सातशे किलो वजनाचे रोहित्र तीन दिवसात वरपर्यंत पोहोचवून ते कार्यान्वित करुन वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले. महावितरणचे शाखा अभियंता सागर पवार, यंत्रचालक दिपक शिवतरे, जनमित्र राजू वणवे, रणजित बाबर व भगवान ठाकूर, अक्षय शिवतरे, गुणाजी तुपे, संतोष जेधे, श्रीकांत पारठे, अजय पारठे,

निवृत्ती कंक, विजय नवले व संजय पाटील /. तर धानवली व वाघमारे वस्तीवरील सुरेश वाघमारे, लक्ष्मण धानवले, श्रीराम धानवले, नथु धानवले, गणेश धानवले, रामभाऊ डोईफोडे, नामदेव वाघमारे, गणेश वाघमारे, अनिल धानवले, अजित धानवले, मुकुंद धानवले व संतोष धानवले या ग्रामस्थांनीही अथक परिश्रम घेतले.

रायरेश्वर वस्तीवरील रोहित्र बदलण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी जे परिश्रम घेतले. त्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे व त्यांना मदत करणाऱ्या ग्रामस्थांचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील व कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांनी कौतुक केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com