सकाळ इम्पॅक्ट : सिंहगड रस्त्यावरील अडथळा ठरणारे धोकादायक खांब महावितरणने काढले

निलेश बोरुडे
Monday, 9 November 2020

सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ वापरात नसलेले विजेचे खांब अनेक दिवसांपासून उभे असून त्यांचा वाहतुकीस अडथळा होत असल्याबाबत दै. 'सकाळ' मधून वृत्त प्रसारित झाल्यानंतर त्याची तातडीने दखल घेऊन महावितरणने खांब काढून घेतले आहेत.

किरकटवाडी : सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ वापरात नसलेले विजेचे खांब अनेक दिवसांपासून उभे असून त्यांचा वाहतुकीस अडथळा होत असल्याबाबत दै. 'सकाळ' मधून वृत्त प्रसारित झाल्यानंतर त्याची तातडीने दखल घेऊन महावितरणने खांब काढून घेतले आहेत. महावितरणचे अतिरिक्त अभियंता कल्याण गिरी व सहाय्यक अभियंता सचिन आंबवले यांनी प्रत्यक्ष हजर राहून खांब हटविण्याचे काम करून घेतले.

Success Story : २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात 'यूपीएससी'त केलं टॉप!​

काही वर्षांपूर्वी नांदेड फाट्याजवळ रस्त्याचे काम सुरू असताना सदर खांबांवरील विजेच्या तारा काढून शेजारी  दुसऱ्या खांबावरून जोडण्यात आल्या होत्या. त्यावेळी संबंधित ठेकेदाराने खांबही काढणे अपेक्षित होते; परंतु अर्धवट काम करत ठेकेदाराने खांब तसेच ठेवले. वापरात नसलेल्या खांबांचा वाहतुकीस अडथळा तर होतच होता शिवाय जमिनीलगत गंज लागल्याने खांब कमकुवतही होऊ लागले होते. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.

यंदाची दिवाळी पवार कुटुंबियांसाठी वेगळी; घेतला मोठा निर्णय​

'सकाळ'च्या माध्यमातून याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले, त्यावेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून खांब तातडीने काढून घेतले जातील असे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार अतिरिक्त अभियंता कल्याण गिरी, सहाय्यक अभियंता सचिन आंबवले, महावितरणचे कर्मचारी व होमगार्डचे जवान यांनी रस्त्यावरून सुरू असलेल्या वाहतुकीबाबतच्या सुरक्षेसंबंधी खबरदारी घेऊन खांब हटविण्याचे काम करून घेतले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ'मध्ये बातमी आल्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्या बातमीची दखल घेतली. बातमी आल्यानंतर अवघ्या दोन-तीन दिवसांतच खांब काढण्यात आले आहेत. सर्व नागरिकांच्या वतीने 'सकाळ'चे आभार. -कुणाल सरवदे,आरपीआय, खडकवासला मतदार संघ युवक आघाडी अध्यक्ष.

ज्यावेळी या खांबावरील तारा काढण्यात आल्या त्याच वेळी खांबही काढणे आवश्यक होते परंतु संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण केले नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून अपघात टाळण्यासाठी महावितरणने खांब हटवले आहेत.-सायस दराडे, कार्यकारी अभियंता, महावितरण.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL removes dangerous poles on Sinhagad road