बीओटी तत्वावर एमएसआरडीसी रिंगरोडचा पहिला टप्पा विकासित करणार 

MSRDC will develop the first phase of the ring road on BOT basis.jpg
MSRDC will develop the first phase of the ring road on BOT basis.jpg

पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या पहिल्या टप्यातील पश्‍चिम भागातील सत्तर किलोमीटर लांबीच्या रिंगरोड "बीओटी' तत्वावर (बांधा, वापरा आणि हस्तांतर करा) विकासित करण्याचा प्रस्ताव महामंडळाकडून तयार करण्यात आला आहे. लवकरच तो राज्य सरकारच्या पायाभूत समितीसमोर सादर करण्यात येणार आहे. 

खेकडे, मासे पकडणाऱ्यांच्या हाती आले टॅब

पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला रिंगरोड 2007 पासून प्रादेशिक विकास आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला होता. ऑगस्ट 2011 मध्ये शासनाने एमएसआरडीसीच्या रिंगरोडला मान्यता दिली. त्यामुळे प्रादेशिक विकास आराखड्यातील प्रस्तावित रिंगरोड ऐवजी नव्याने रिंगरोडची आखणी एमएसआरडीकडून करण्यात आली. 

शिरूर- हवेलीतील कुटुंबांना माहेरचा आधार

नव्याने आखण्यात आलेल्या रिंगरोडला राज्य सरकराकडून नुकताच "विशेष राज्य महामार्गा'चा दर्जा देण्यात आला आहे. या रस्त्याच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या टीपीएफ या सल्लागार कंपनीने भूसंपादन आणि रस्ता विकासित करण्यासाठी टीडीआर, रोख रक्कम, नगर रचना योजना अथवा पीपीपी मॉडेल असे चार पर्याय सुचविले होते. 

दिव्यांग विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण

परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारला आर्थिक चणचण भासू लागली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात या संदर्भात मुंबई येथे महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये रस्ता विकसनासाठी आर्थिक मॉडेल तयार करण्याच्या सूचना सल्लागार कंपनीला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार हा रस्त्याचे काम बीओटी तत्वावर करावे आणि टोल आकरावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. महामंडळाकडून लवकरच हा प्रस्ताव पायाभूत समितीकडे सादर करण्यात येणार असल्याचे महामंडळातील वरिष्ठ सुत्रांकडून सांगण्यात आले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रिंगरोडवर टोल लावणार ? 
एमएसआरडीसीच्या रिंगरोडची लांबी सुमारे 123 कि.मी आहे. शिरूर, पुरंदर, हवेली, भोर, वेल्हा आणि मुळशी या तालुक्‍यातून रिंगरोड जाणार आहे. यासाठी 2300 हेक्‍टर जागेची आवश्‍यकता आहे. पहिल्या टप्यात पश्‍चिम भागातील 70 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. खेडशिवापूरच्या पुढील पासून निघणारा हा रिंगरोड मुंबई एक्‍स्प्रेसला येऊन जोडणार आहे. रिंगरोड ज्या गावातून जाणार आहे. भूसंपादन आणि रस्ता विकसित करण्यासाठी सुमारे दहा हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. बीओटी तत्वावर हा रस्ता विकासित करण्यात येणार असल्यामुळे त्यावर टोल लावण्यात येणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com