

Maharashtra ST Employees Salary News Pratap Sarnaik Directs MSRTC to Arrange November Salary Before Diwali Festival
esakal
-हरिदास कड
चाकण: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) सुमारे ८३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.