
पुणे : राज्य सरकारचे ई- वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण एसटी महामंडळानेदेखील अंगीकारले असून, भविष्यात घेण्यात येणाऱ्या स्वमालकीच्या पाच हजार बसगाड्यांपैकी दरवर्षी किमान १ हजार बसगाड्या या ई- बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानावर त्या आधारित असतील. यात एकात्मिक सुरक्षा प्रणालीचा अंतर्भाव असणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.