

स्वारगेट - राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) बससेवेत ‘लाडकी बहिण’ आणि ज्येष्ठ नागरिकांबाबत भेदभाव होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. स्वारगेट स्थानकातून सुटणाऱ्या अनेक एसटी बसमध्ये अर्धे तिकीट असणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास नाकारण्यात येत असून, फक्त पूर्ण तिकीट घेणाऱ्या प्रवाशांनाच बसमध्ये प्रवेश दिला जात आहे.