esakal | ...अखेर बारामतीतील रस्त्यांच्या कामांना मिळाला मुहूर्त 
sakal

बोलून बातमी शोधा

baramati.jpg


नगरपालिकेला 14 कोटी 54 लाखांचा निधी सरकारकडून प्रस्तावित 

...अखेर बारामतीतील रस्त्यांच्या कामांना मिळाला मुहूर्त 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : नगरपालिका हद्दीतील रस्त्यांच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. शहरातील रस्त्यांबाबतच्या दोन महत्त्वाच्या निविदांची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यांना काम सुरू करण्याचे प्रारंभ प्रमाणपत्रही दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विश्वास ओहोळ यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर बारामती नगरपालिकेच्या विविध कामांसाठी निधी प्राप्त झाला. रस्ते डांबरीकरण, खडीकरण व काही ठिकाणी कॉंक्रीटीकरणाच्या कामांचा यात समावेश होता. गेल्या अनेक महिन्यांपासून ही कामे व्हावीत, या साठी बारामतीकरांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या मध्ये रस्त्यांच्या कामासाठी नगरपालिकेला 14 कोटी 54 लाखांचा निधी सरकारने प्रस्तावित केला आहे. अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या तीन हत्ती चौक ते संगम पुलापर्यंतच्या रस्त्याचाही वर्क ऑर्डर दिलेल्या कामांमध्ये समावेश आहे. 

Breaking : राज्य सरकारने रेडी-रेकनरच्या दरात केली वाढ; सर्वाधिक पुणे जिल्ह्यात तर...

बारामतीतील एकही रस्ता खराब असू नये, असा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आग्रह आहे. गतीरोधकांबरोबरच खड्ड्यांमुळे अनेकांना कमरेचा व मणक्याचा त्रास सुरु झाला असून काही वाहनचालकांच्या वाहनांचेही नुकसान झालेले आहे. या पार्श्वभूमीवर निधी प्राप्त झाल्याने लवकर रस्त्यांच्या कामांना प्रारंभ करावा, रस्ते करताना अनावश्‍यक गतिरोधक काढून टाकावेत आणि आवश्‍यक गतिरोधक व रस्त्याच्या दोन्ही बाजूंना व मध्येही थर्मोप्लास्टचे पांढरे पट्टे मारण्याचेही काम व्हायला हवे, अशी बारामतीकरांची मागणी होती. 

कंत्राटदारांना आता वर्क ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे पावसाचा जोर ओसरताच हे काम सुरु होईल. लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना दिलासा मिळावा, असा या मागील उद्देश आहे. 
- विश्वास ओहोळ, 
उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, बारामती