Mukhyamantri Mazi Shala : मुख्यमंत्री माझी शाळा योजनेमध्ये राज्यात बारामतीचा झेंडा

मुख्यमंत्री माझी शाळा योजनेमध्ये बारामतीचा झेंडा राज्यात फडकल्याची माहिती पुढे आली आहे. अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट,बारामती संचलित शारदाबाई पवार विद्यानिकेतन शाळेचा मुख्यमंत्री माझी शाळा योजनेत खाजगी शाळांमध्ये राज्यात दुसरा क्रमांक आला आहे.
Mukhyamantri Mazi Shala
Mukhyamantri Mazi ShalaSakal

माळेगाव : मुख्यमंत्री माझी शाळा योजनेमध्ये बारामतीचा झेंडा राज्यात फडकल्याची माहिती पुढे आली आहे. अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट,बारामती संचलित शारदाबाई पवार विद्यानिकेतन शाळेचा मुख्यमंत्री माझी शाळा योजनेत खाजगी शाळांमध्ये राज्यात दुसरा क्रमांक आला आहे.

मुख्यमंत्री माझी शाळा हे अभियान नुकतेच राज्यात राबवण्यात आले. या अभियानामध्ये राज्यात एक लाख तीन हजाराहून अधिक शाळांनी भाग घेतला होता. त्यामध्ये शारदाबाई पवार (शारदानगर) या शाळेने तब्बल २१ लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले.

मुख्यमंत्री माझी शाळा हे अभियान शासनस्तरावर नुकतेच राज्यात राबवण्यात आले. राज्यात १ कोटी ९९ लाख विद्यार्थ्यांनी या योजनेत सहभाग घेतला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा- सुंदर शाळा हे अभियान राज्यभर राबवण्यात आले.

त्याचे मूल्यांकन समितीने २९ फेब्रुवारी २०२४ रोजी मूल्यांकन केले आणि आठ विभागातील प्रत्येकी एक याप्रमाणे शाळा निवडण्यात आल्या. यामध्ये सरकारी व खाजगी शाळांचे मूल्यांकन करण्यात आले. खाजगी शाळांमध्ये राज्यात शारदाबाई पवार विद्यानिकेतन शाळेने दुसरा क्रमांक मिळवला. येत्या ५ मार्च ला मुंबई येथे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, या अभियानामधील शारदाबाई शाळेने केलेली वीज बचत, आर्थिक साक्षरता, डिजिटल उपकरणांचा वापर, लोकशाही संसदीय मूल्यांचा वाप, वैज्ञानिक दृष्टिकोन या बाबींचे मूल्यांकन महत्वपुर्ण ठरले. त्याचबरोबर प्रधानमंत्री पोषण अभियान अंतर्गत परसबाग, अन्नाची योग्य रीतीने विल्हेवाट व व्यवस्थापनाही अधिक महत्व दिल्याचे निदर्शनास आले.

तसेच शाळेतील मूल्य संस्कार, वृक्ष संवर्धन, वडीलधाऱ्यांचा सन्मान अशा अनेक बाबींचा यामध्ये समावेश लक्षवेधी ठरला. सहाजिकच हजारो शाळांच्या झालेल्या मूल्यांकन प्रक्रियेत शारदानगरच्या शाळेने बाजी मारली.

अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार यांच्यासह विश्वस्त, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, संस्थेचे समनव्ययक प्रशांत तनपुरे यांनी मुख्याध्यापक सूर्यकांत मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभिनंदन केले.

शारदाबाई पवार विद्यानिकेतनचे वैशिष्ट्य काय ?

फक्त शैक्षणिक घोकमपट्टी या प्रकाराच्या पलीकडे जाऊन शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर या शाळेने आंतरराष्ट्रीय स्तरावर फिनलँड व नेदरलँड, इजराइल, कोस्टारीका, बाली (इंडोनेशिया) या देशातील शैक्षणिक संस्थांशी शिक्षक प्रशिक्षणासाठी शैक्षणिक सामंजस्य करार केला. ही शाळा भारतातील ग्राममंगल, नेहरू विज्ञान केंद्र , होमीभाभा विज्ञान केंद्र,

अगस्त्या इंटरनॅशनल फौंडेशन, कुप्पम या संस्था मार्फत शिक्षक प्रशिक्षण आयोजन करते. मेंदु आधारित शिक्षण पध्दती, अद्यावत तंत्रज्ञानाचा अवलंब, त्याकरता मेकर्स स्पेस लॅब मीडिया लॅब, इनोवेशन लॅब, अटल लॅब फन सायन्स गॅलरी अशा अनेक नवतंत्रज्ञानाचा वापर येथील विद्यार्थी करतात. शिक्षक, विद्यार्थ्यांना गुगलद्वारे मोफत अनलिमिटेड स्टोअरेज स्पेस उपलब्ध करून देण्यात आले असून एका विद्यार्थ्याने नासा मधील खडतर प्रशिक्षणही पूर्ण केले आहे.

शाळेचे सामाजिक उपक्रम...

या शाळेत सन २००२ पासून जीवन समृद्धी प्रकल्प राबविला आहे. जर्मन, स्पॅनिश या व्यावसायिक भाषांचा देखील अभ्यास येथील विद्यार्थी करतात. एवढेच नाही तर सामाजिक उपक्रम अंतर्गत या शाळेने बारामती व पुरंदर तालुक्यातील १२५ अनुदानित माध्यमिक शाळांना सायन्स किटचे वाटप टाटा ट्रस्ट फंडातून केले.

शाळेच्या पुढाकाराने चला समृद्ध गाव घडवू या या योजने अंतर्गत पाणी फाऊंडेशन व टाटा ट्रस्ट च्या आर्थिक सहायाने जलसंधारणाचे यशस्वी भरीव काम केले. कोल्हापूर, सांगली, चिपळूण व केरळ पूरग्रस्तांसाठी शाळेच्या विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यामार्फत मदत केली. शाळेच्या पुढाकाराने गरीब व होतकरू मुलींसाठी टाटा ट्रस्टच्या फंडातून १९०० सायकलींचे वाटप करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com