Vidhan Sabha 2019 : कसबा विधानसभा मतदारसंघातून टिळक, शिंदे, धनवडे यांचे शक्‍तिप्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

विधानसभा 2019
पुणे -  कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना- आरपीआय युतीच्या उमेदवार मुक्‍ता टिळक, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अरविंद शिंदे आणि शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल केले. उमेदवारी भरण्यासाठी शुक्रवारी (ता. ४) अंतिम दिवस असून गुरुवारी पाच उमेदवारांनी एकूण नऊ अर्ज दाखल केले.

मुक्ता टिळक यांनी ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन मतदारसंघात पदयात्रा काढली. या वेळी खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजपचे नगरसेवक शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. दुपारी त्यांनी उमेदवारी  अर्ज भरला. 

काँग्रेस आघाडीचे उमेदवार अरविंद शिंदे यांनी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला. या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, खासदार वंदना चव्हाण, मोहन जोशी, त्यांच्यासह पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते. 

शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी गजानन पंडित यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. यांच्या शिवाय बहुजन समाज पार्टीचे फैय्याज मुस्ताक सैय्यदराज, अपक्ष उमेदवार अस्लम अब्दुल बागवान आणि  नरेंद्र ज्ञानेश्‍वर पावटेकर यांनीही अर्ज दाखल केले.

शिवसेना नेमकी कोणाकडे?
कसबा विधानसभा मतदारसंघात युतीत बंडखोरी झाली आहे. शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांच्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. पक्षाच्या अधिकृत उमेदवार मुक्ता टिळक यांच्या रॅलीत शहरप्रमुख संजय मोरे सहभागी झाले होते. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाच्या बाजूने हे यावरून तेथे चर्चा रंगली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukta Tilak Arvind Shinde Vishal Dhanwade filed nominations from Kasaba assembly constituency