Kasba Bypoll Election: कसब्यात सहानुभूतीची एक लाट होती... कुणाल टिळकांचं चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर

टिळक कुटुंबीयांना उमेदवारी न देण्यावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे
Mukta Tilak Kunal Tilak
Mukta Tilak Kunal TilakSakal

काही दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आणि चर्चेचा विषय ठरलेल्या पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भाजपला पराभवाचा मोठा धक्का बसला. या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली. कसब्याची पोटनिवडणूक ही उमेदवारांच्या निवडीपासून ते निकालापर्यंत राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली होती.

कसबा पोटनिवडणुकीत भाजपने टिळक कुटुंबाबाहेर उमेदवारी का दिली याचं स्पष्टीकरण, चंद्रकांत पाटील यांनी काल दिलं होतं. त्यावर आता मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळकांचं चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर दिलं आहे. "माझ्या आईने कसबा पेठ मतदारसंघात २० ते २५ वर्षे काम केले होते. या काळात तिने निर्माण केलेला जनसंपर्क आजारपणाच्या दोन वर्षांच्या काळात पूर्णपणे संपला, असे बोलणे योग्य ठरणार नाही असं कुणाल टिळक म्हणाले आहेत.

तर ते पुढे बोलताना ते म्हणाले की, माझ्या आईने भाजप पक्षासाठी कसब्यात केलेल्या कार्याचा आदर व्हायला हवा, अशा शब्दांत कुणाल टिळक यांनी पुण्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिले. चंद्रकांत पाटील यांनी कसबा पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबीयांना उमेदवारी न देण्यामागील कारण स्पष्ट केलं होतं.

Mukta Tilak Kunal Tilak
Maharashtra Politics: राष्ट्रवादी-काँग्रेसला दणका, सरपंच, माजी नगरसेवकांसह शेकडो पदाधिकारी शिंदे गटात

मुक्ता टिळक यांच्या आजारपणामुळे दोन वर्षांच्या काळात कसब्यातील मतदारांशी असणारा त्यांचा संपर्क तुटला होता. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक यांना मुक्ताताईंच्या सेवेसाठी बराच वेळ द्यावा लागत होता. त्यामुळे त्यांचाही कसब्यातील राजकीय आणि सामाजिक एक्जिस्टन्सही कमी झाला होता. याच कारणामुळे आम्ही कसबा पोटनिवडणुकीत भाजपने टिळक कुटुंबाबाहेर उमेदवारी दिली, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मी एवढंच सांगेन की, माझ्या आईने गेली २०-२५ वर्षे कसब्यात काम केलं. या काळात तिने निर्माण केलेला जनसंपर्क दोन वर्षांच्या आजारपणाच्या काळात नक्कीच कमी झाला नव्हता. त्यामुळे कसब्यात सहानुभूतीची एक लाट होती.

Mukta Tilak Kunal Tilak
Maharashtra Inflation Rate : केंद्रानंतर राज्यातही महागाईत वाढ! राष्ट्रवादी म्हणाली, "सरकार गतीमान, दरवाढ वेगवान"

कसबा पोटनिवडणुकीत भाजप पक्ष मैदानात उतरला तेव्हा वेगळ्याप्रकारे झालेले मतदान दिसून आले. २०-२५ वर्षांचा जनसंपर्क दोन वर्षांमध्ये कमी होत नसतो. माझी आई आजारी असतानाही कार्यक्रमांना जात होती. तिने कसबा विधानसभा मतदारसंघासाठी निधी आणला होता, विकासकामेही सुरु होती. गिरीश बापट यांच्यानंतर माझ्या आईने कसबा मतदारसंघ बांधून ठेवला होता. त्यामुळे मुक्ता टिळक यांच्या कार्याचा आदर झाला पाहिजे. माझ्या आईच्या कार्याकडे दुर्लक्ष करणं बरोबर नाही, असे कुणाल टिळक यांनी यावेळी म्हंटलं आहे.

Mukta Tilak Kunal Tilak
Chhagan Bhujbal: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com