मुक्तांगण विज्ञान शोधिका बंद करुन व्यापारी संकुल उभारण्याचा घाट

‘मुक्तांगण विज्ञान शोधिका’ बंद करून त्या जागोवर व्यापारी संकुल उभारण्याचा घाट घालण्यात येत आहे.
मुक्तांगण विज्ञान शोधिका
मुक्तांगण विज्ञान शोधिकाsakal

पुणे : विद्यार्थ्यांसाठी असणारी प्रयोगशाळा अशी ओळख असणाऱ्या ‘मुक्तांगण विज्ञान शोधिका’ बंद करून त्या जागोवर व्यापारी संकुल उभारण्याचा घाट घालण्यात येत आहे. विज्ञानशोधिकेची उभारणी केलेल्या भारतीय विद्या भवन संस्थेला याबाबत कागदपत्रे दाखवा आणि आपली म्हणणे मांडावे, असे संबंधित शासकीय कार्यालयाकडून पत्राद्वारे सांगण्यात आले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू आणि केंद्र सरकारचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. वि. ग. भिडे यांच्या पुढाकारातून साधारणत: ३० वर्षांपूर्वी भारतीय विद्याभवन संस्था परिसरात मुक्तांगण विज्ञान शोधिका स्थापन करण्यात आली. त्यानंतर विज्ञान शोधिकेसाठी स्वतंत्र जागेची मागणी संस्थेने राज्य सरकारकडे केली. या मागणीनुसार राज्य सरकारने सध्या मुक्तागंण विज्ञान शोधिका असलेली जागा संस्थेला दिली आहे.

मुक्तांगण विज्ञान शोधिका
राज्यात ‘शाळा मानक प्राधिकरण’ स्थापन करण्यासाठी नेमली समिती

या जागेवर व्यापारी संकुलासह अन्य आरक्षणे प्रस्तावित होती. त्यामुळे राज्य सरकारने त्यावेळी जागा देताना आरक्षणात बदल करून जागेचे रहिवासी क्षेत्रात रूपांतर केले होते. मात्र, असे असतानाही ही जागा व्यापारी संकुलासाठी आरक्षित असल्याचा दावा करून राधाकृष्ण प्रतिष्ठान आणि पानशेत पूरग्रस्त रहिवासी संघाने ‘विज्ञानशोधिका बंद करावी आणि जागा व्यापारी संकुलासाठी मिळावी’, अशी मागणी केली आहे.

दरम्यान,‘‘याबाबत चौकशी करून सविस्तर अहवाल कार्यालयाकडे सादर करावा, असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुणे शहर तहसिलदार यांना पाठविण्यात आले आहे,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सांगितले.

‘‘भारतीय विद्या भवन संस्थेच्या परिसरात १९९२ मध्ये मुक्तांगण विज्ञान शोधिका स्थापन करण्यात आली. त्यानंतर ही विज्ञान शोधिकेसाठी स्वतंत्र जागा राज्य सरकारकडून मागण्यात आली. त्याप्रमाणे सध्या विज्ञान शोधिका असलेली जागा राज्य सरकारने रहिवासी क्षेत्रात रुपांतर करून संस्थेला दिली. परंतु तरीही तहसिलदार कार्यालयाकडून आमचे म्हणणे मांडावे आणि कागदपत्रे सादर करावीत, अशी सूचना करणारे पत्र संस्थेला आले आहे. संस्थेकडे सर्व कायदेशीर कागदपत्रे असून ती लवकरच सादर केली जातील.’’

- नंदकुमार कार्किडे, मानद सचिव व संचालक, भारतीय विद्या भवन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com