मुळा मुठा शुध्दीकरण प्रकल्पाला जायका प्रकल्प म्हणणे चुकीचे : प्रकाश जावडेकर (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जून 2019

बाणेरच्या पहिल्या पॅकेजचे काम 70 % झाले असून ते वेळेत पुर्ण होईल. चार पॅकेजची अतिंम मान्यता या महिन्या दिड महिन्यात येईल. अचारसंहिता लागण्यापुर्वी या चारही  पॅकेजचे भुमिपुजन होईल. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

पुणे : ''मुळा मुठा शुध्दीकरण प्रकल्पाला जायका प्रकल्प असे संबोधने हे चुकीचे आहे. हा प्रकल्प भारत सरकार आणि पुणे महापालिकेचा सयुंक्त प्रकल्प आहे. जायका ही बँक आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने जायका या बँकेकडून कर्ज घेतले असून केंद्रसरकारच ते फेडणार आहे. महापालिका किंवा राज्य सरकारला फेडावे लागणार नाही. त्यामुळे मोदींकडून पुण्याला मिळालेली मोठी देणगी आहे. अशी माहिती पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. 

मुळा मुठा शुध्दीकरण प्रकल्पाचा विस्तृत आढावा आज महापालिका, बँक सल्लागर, वन विभाग अधिकारी, पर्यावरण खात्याचे नदी विकासाचे  दिल्लीतून आलेले अधिकारी, महापौर आणि स्टँडीग कमिटी सभागृह नेते यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mula Mutha Purification Project called as jayaka project is wrong says Prakash Javadekar