मुळानदी किनारा रस्ता सांगवीकरांच्या मुळावर

रमेश मोरे
गुरुवार, 12 जुलै 2018

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथील मुळानदी किनारा रस्त्याची मोठ्या पावसाने ठिकठिकाणी खड्डे पडुन चाळण झाली आहे. शिवांजली कॉर्नर ते मुळानगर या भागात हा रस्ता रहदारीसाठी खड्डेमय व धोकादायक बनला आहे. मे महिन्याच्या अखेरीसच या रस्त्याच्या ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम पुर्ण झाले आहे. खोदाई नंतर येथील चर खडी मुरूम व डांबरीकरण करून दुरूस्त करण्यात आले. मात्र मोठ्या पावसात या भागातील खोदाईवर केलेले डांबरीकरण खचले आहे.

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथील मुळानदी किनारा रस्त्याची मोठ्या पावसाने ठिकठिकाणी खड्डे पडुन चाळण झाली आहे. शिवांजली कॉर्नर ते मुळानगर या भागात हा रस्ता रहदारीसाठी खड्डेमय व धोकादायक बनला आहे. मे महिन्याच्या अखेरीसच या रस्त्याच्या ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम पुर्ण झाले आहे. खोदाई नंतर येथील चर खडी मुरूम व डांबरीकरण करून दुरूस्त करण्यात आले. मात्र मोठ्या पावसात या भागातील खोदाईवर केलेले डांबरीकरण खचले आहे.

ठिकठिकाणी मोकळी खडी, रस्त्यात पडलेले खड्डे यामुळे नागरीकांना रहदारीसाठी कसरत करावी लागत आहे. रस्ता मोठा असुनही केवळ खड्डे असल्याने गाड्या घसरून या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सन 2011-12 दरम्यान या रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आले होते. पुणे व औंधला जाण्यासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याच मार्गावर शाळा आहे.

सकाळी शाळा भरण्या व सुटण्याच्या वेळेला या रस्त्यावर गर्दी होवुन वहातुकची कोंडी होते. रस्त्यावरील खड्डयांमुळे शाळकरी मुले, पालकांना पायी चालणेही अडचणीचे ठरत आहे. रस्त्याकडेला बेकायदा पार्किंग - खड्डेमय रस्त्यात भरीस भर म्हणुन या मोठ्या रस्त्याच्या दुतर्फा नागरीकांनी पार्कींग करून केलेले वहानतळ रहदारीसाठी अडथळा ठरत आहे. यामुळे मोठा रस्ता अरूंद झाला आहे.

अंधुक प्रकाशाचे पथदिवे

शिवांजली कॉर्नर ते मुळानगर या भागातील पथदिवे अंधुक असल्याने या परिसरात कमी प्रकाशाचा त्रास नागरीकांना सहन करावा लागत आहे. येथील जुने दिवे बदलुन नविन एलईडी दिवे लावण्यात यावे अशी नागरीकांमधुन मागणी होत आहे.

ओसंडुन वहाणाऱ्या कचराकुंड्या
गेली आठवडाभरापासुन येथील कचराकुंड्यामधील कचरा रस्त्यावर येत असल्याने नागरीकांना यातुनच रहदारी करावी लागत आहे. समोर रस्त्यालगतच्या कचराकुंड्याची जागा बदलुन मागे ठेवण्यात येणार असल्याचे स्थानिक स्थापत्य व आरोग्य विभागाकडुन सांगण्यात आले होते. कचराकुंड्या मागे हटवुन रस्त्यावर येणारा व नागरीकांकडुन रस्त्यावर फेकला जाणारा कचऱ्याला प्रतिबंध व्हावा यासाठी कचराकुंड्या भोवती पत्राशेड मारण्यात येणार होते. एक महिन्यानंतरही येथील उपाययोजना करण्यात आली नसल्याने येथील कचरा रस्त्यावर येत आहे. यामुळे भटकी जनावरे कुत्र्यांचा वावर वाढला असुन शाळकरी मुलांना येथुन ये जा करताना भटकी कुत्री, जनावरे यांच्यापासुन सावधगिरी बाळगत मार्गक्रमण करावे लागते. 
या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे अशी सांगवीकरांकडुन मागणी होत आहे.

नुकतेच येथील ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम पुर्ण करण्यात आले. येथील कामाचे चर बुजवुन तात्पुरते डांबरीकरण करण्यात आले होते. पावसाच्या उघडीपी नंतर येथील खड्डे बुजवण्यात येतील. पिंपळे गुरव महाराजा हॉटेल ते  सांगवी औंध स्पायसर पुलापर्यंत या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण काम करणे प्रस्तावित आहे.

- शिरिष पोरेडी- अभियंता स्थापत्य "ह" प्रभाग
 

Web Title: Mula river coast road is the road of the Sangviikar