

मुल्ला लॉ कॉलेजमध्ये
विविध कार्यक्रम उत्साहात
सातारा, ता. २१ : इस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेजच्या वतीने विविध कार्यक्रम झाले. डॉ. मनोहर निकम यांचे ‘फाळणीच्या ऐतिहासिक घटना व त्यातील त्याग’ या विषयावर व्याख्यान झाले. ब्रह्मकुमारी रुक्मिणी बहनजी यांचे ‘नशामुक्त प्रतिज्ञा’ अभियानावर व्याख्यान झाले. त्यानंतर सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांनी नशामुक्तीची प्रतिज्ञा घेतली. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रश्नमंजूषा स्पर्धा, पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमासाठी प्राचार्या डॉ. वैशाली जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.